सध्या देशामध्ये ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसत आहे. काही कालावधी आधी झालेल्या ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अनेक कंपन्यांनी आपले आगामी ईव्ही वाहने सादर केली होती. अनेक कंपन्यांनी आपली वाहने लॉन्च देखील केली आहेत. त्यामध्ये एमजी मोटर इंडियाचा देखील समावेश आहे. एमजी मोटर इंडियाने अलीकडेच त्यांची इलेक्ट्रिक कार MG ZS च्या १० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा पूर्ण केला आहे. कंपनीने ही कार २०२० मध्ये भारतात लॉन्च केली होती.
Financial Express च्या वृत्तानुसार ही इलेक्ट्रिक कार एक्साईट आणि एक्सक्लुझिव्ह अशा दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली होती. ज्याची किंमत २३. ३८ लाख आणि २७.२९ लाख (एक्सशोरूम ) रुपये ठेवण्यात आली होती.
एमजी आपल्या ZS इलेक्ट्रिक कारमध्ये चार्जिंगसाठी ६ पर्याय देते. डीसी सुपर फास्ट चार्जर, एसी फास्ट चार्जर्स, एमजी डिलरशिपवर एसी फास्ट चार्जर्स. ZS इलेक्ट्रिक कार आणि मोबाईल चार्जिंग सपोर्ट २४*७ RSA MG चार्ज उपक्रमांतर्गत १,००० एसी फास्ट चार्जर्स लावले जाणार आहेत. याशिवाय कंपनी आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये मोफत एसी फास्ट चार्जर इंस्टॉल करणार आहे.
MG ZS EV मध्ये ५०. ३ KWh प्रिझमॅटिक सेल बॅटरी देण्यात आली आहे. जी ४६१ किमी इतके अंतर धावते. तसेच या बॅटरीला ला एका इलेक्ट्रिक मोटरसह जोडण्यात आले आहे. जे १७३ एचपीची पॉवर आणि २८० एनएम चा पीक टॉर्क जनरेट करते. या एसयूव्हीला ०-१०० किमी वेग पकडण्यासाठी ८.५ सेकंदाचा वेळ लागतो.
गाडीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्यात अपडेटेड १०.१-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. वायरलेस चार्जिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांशिवाय ७५ कार कनेक्टेड फीचर्स जोडण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कंपनीने त्यात ६ एअरबॅग्ज, हिल डिसेंट कंट्रोल, ईएससी, रीअर ड्राइव्ह असिस्ट, ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये जोडली आहेत.