MG मोटर्स ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. एमजी मोटर या कंपनीने आपले Astor चे स्पेशल एडिशन मॉडेल लॉन्च केले आहे. ‘Astor Blackstorm’ एडिशन म्हणून हे मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. हे मॉडेल मर्यादित काळासाठी चालणारी मिड स्पेक स्मार्ट ट्रीटवर आधारित आहे. ग्लॉस्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशननंतर एमजी मोटरद्वारे भारतात लॉन्च केलेले हे दुसरे मॉडेल आहे. तथापि ते मॉडेल टॉप स्पेक सॅव्ही ट्रिमवर आधारित आहे. ब्रिटिश मालकीच्या चिनी कार निर्मात्याने अद्याप भारतात Astor Blackstorm चे किती मॉडेल्स ऑफर केले जाणार आहेत याची संख्या उघड केलेली नाही.

”संपूर्ण देश आगामी काळात येणाऱ्या सण-उत्सवांच्या तयारीला लागला आहे. एमजी मोटर इंडिया आमच्या ग्राहकांना Astor च्या या नवीन ब्लॅकस्टॉर्मच्या लिमिटेड एडिशन मॉडेलमुळे खास अनुभव मिळेल याची खात्री देते.” असे Astor च्या नवीन एडिशनच्या लॉन्चिंगवेळी एमजी मोटर इंडियाचे डेप्युटी मॅनेजर डायरेक्टर गौरव गुप्ता म्हणाले. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 7 September: राज्यात कुठे स्वस्त तर कुठे महागलं पेट्रोल-डिझेल? पाहा आजचे दर

काय असणार नवीन ?

Astor ब्लॅकस्टॉर्म मॉडेलमध्ये स्टॅंडर्ड मॉडेलच्या तुलनेत केवळ कॉस्मेटिक अपग्रेड आणि काही अतिरिक्त सुविधा मिळतात. या मोडलेच्या एक्सटेरिअरसह इंटेरिअरमध्ये देखील ऑल ब्लॅक ट्रीटमेंट देण्यात आली आहे. ब्लॅकस्टॉर्म लिमिटेड एडिशनमध्ये मिळणाऱ्या अपडेटबद्दल बोलायचे झाल्यास याच्या डिझाइनमध्ये ऑल ब्लॅक हनीकॉम्ब पॅटर्न फ्रंट ग्रील, हेडलॅम्प्समध्ये स्मोक्ड इफेक्ट, ग्लॉसी ब्लॅक डोअर गार्निश, रेड फ्रंट ब्रेक कॅलिपर्ससह ब्लॅक अलॉय व्हील आणि ब्लॅक आऊट रूफ रेल हे अपडेट मिळतात.

इंजिन

एमजी Astor ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्ये केवळ १.५ लिटरचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरकर्त्यांना मिळणार आहे. हे इंजिन १०९ बीएचपी पॉवर आणि १४४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आलेले आहे. यामध्ये १.३ लिटरचे टर्बोचार्ज इंजिन देखील मिळते जे -स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटिकसह जोडण्यात आले आहे.

हेही वाचा : भारतात लॉन्च झाली BGAUSS ची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जमध्ये ८५ किमी धावणार, जाणून घ्या

MG Motor ने Astor चे ब्लॅकस्टॉर्मचे लिमिटेड एडिशन लॉन्च केले आहे. ज्याच्या मॅन्युअल गिअरबॉक्स व्हर्जन असणाऱ्या मॉडेलची किंमत १४.४८ लाख (एक्सशोरूम) रुपये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मॉडेलची किंमत १५.७७ लाख (एक्सशोरूम) रुपये इतकी आहे.

Story img Loader