एमजी मोटर इंडिया कंपनीची ZS EV ही भारतातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने ही गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनी ग्राहकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत मोफत चार्जिंक करून देणार आहे. कंपनीने फोर्टम चार्ज आणि ड्राईव्हच्या सहकार्याने नवीन उपक्रम आणला आहे. ZS EV गाडी असलेले ग्राहक फोर्टम चार्ज आणि ड्राईव्हच्या नेटवर्कवर विनामुल्य शुल्कासाठी पात्र असणार आहेत. ही सुविधा केवळ सीसीएस चार्जिंग मानकांशी सुसंग असलेल्या चार्जरवर वैध आहे. अर्थात ZS EV शी सुसंगत आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.
नविन आणि जुन्या ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध असणार आहे. एमजी अॅप्लिकेशनवर ० किमी पर किमी असं नमूद करण्यात आलं आहे. पण १ एप्रिलनंतर ग्राहकांना चार्जिंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ZS EV ur एमजी मोटर कंपनीची भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे. भारतात गाडी लाँच केल्यापासून आतापर्यंत कंपनीने या गाडीचे ४ हजार युनिट्स विकले आहे. भविष्यात कंपनी आणखी इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकताच कंपनीने एक टीझर जारी केला असून या वर्षाअखेरीस नवी इलेक्ट्रिक कार ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. कंपनीने त्याच मॉडेलचा एक छोटा टीझर व्हिडीओ देखील रोल आउट केला असून गाडीचं नाव MG 4 असण्याची शक्यता आहे.
Video: आता टायर पंक्चर होण्याची चिंता नाही! मिशलिन कंपनीचा Puncture Proof Tyre
एमजी मोटरने या नोटसह व्हिडिओ सामायिक केला आहे की ,MG युके प्रीमियरमध्ये या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहित १०० टक्के इलेक्ट्रिक कार सादर करेल. ब्रिटीश ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून ही गाडी लाँच केली जाणार आहे. या गाडीचं सादरीकरण केल्यानंतर लगेचच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. पण याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.