Mg Windsor Ev features: भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत झपाट्याने वाढ होत आहे आणि प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात सध्या आघाडीवर जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाची विंडसर ईव्ही आहे. कॉमेट आणि झेडएस ईव्ही नंतर ब्रँडचे तिसरे ऑल-इलेक्ट्रिक मॉडेल म्हणून लाँच केलेली विंडसर ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी ईव्ही बनली आहे. १५,००० हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आणि सुमारे ३,००० युनिट्सची मासिक विक्री सातत्याने होत असल्याने, या इलेक्ट्रिक हॅचबॅकने ईव्ही सेगमेंटमध्ये एमजीचे स्थान केवळ मजबूत केले नाही तर ब्रँडच्या एकूण वाढीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

वाढत्या इंधनाच्या किमतींना कंटाळून ग्राहक देखील इलेक्ट्रिक कारला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. यामुळेच EV च्या विक्रीचे आकडे देखील वाढताना दिसत आहे.देशात अनेक ऑटो कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. यातही एमजी कंपनीची MG Windsor EV ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या कारला एक खास अवॉर्ड मिळाला आहे.देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक कार एमजी विंडसर ईव्हीला एसर फास्टर अवॉर्ड्स २०२५ मध्ये इलेक्ट्रिक कार ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले आहे. या कारने टाटा मोटर्स, ह्युंदाई, किआ किंवा इतर कंपन्यांच्या मॉडेल्सना मागे टाकले आहे. यापूर्वी या कारला २०२५ चा इंडियन ग्रीन कार ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे.

MG Windsor EV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विंडसर ही एमजीची प्रीमियम कार आहे, जी २०२२४ मध्ये लाँच झाली होती. तुम्ही ही कार ३ व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकता. यात ३८kWh बॅटरी पॅक आहे, जो ३३२Km किमीची रेंज देते. या कारमध्ये एकाच FWD मोटरद्वारे १३४bhp आणि २००Nm टॉर्क जनरेट करते. टॉप-स्पेक व्हेरियंटमध्ये लेव्हल-2 एडीएएस, रिअर एसी व्हेंट्ससह क्लायमेट कंट्रोल, ड्युअल डिजिटल स्क्रीन, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, ३६०-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

आधुनिक फीचर्स

या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक भाषांमध्ये नॉइज कंट्रोलर, जिओ अ‍ॅप्स आणि कनेक्टिव्हिटी, टीपीएमएस, ६ एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस आणि पूर्ण एलईडी लाईट आहे. यात एक उत्तम सीटबॅक पर्याय आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत १३.५० लाख रुपयांपासून ते १५.५० लाख रुपयांपर्यंत आहेत. याने त्याच्या सेगमेंटमध्ये टाटा कर्व्ह ईव्ही, महिंद्रा एक्सयूव्ही४०० लाही मागे टाकले.

विंडसर ईव्ही तीन व्हेरियंटमध्ये येते, ज्यामध्ये बेस (एक्साइट), मिड (एक्सक्लुझिव्ह) आणि टॉप (एसेन्स) यांचा समावेश आहे. यापैकी, एक्साईटला १५%, एक्सक्लुझिव्हला ६०% आणि एसेन्सला २५% मागणी आहे. त्याच वेळी, कंपनीने या कारसोबत बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅन देखील सादर केले आहे. अशा परिस्थितीत, फक्त १०% लोकांनी बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅनसह ही कार बुक केली आहे. उर्वरित ९०% लोकांनी बॅटरी असलेली कार बुक केली आहे.