एमजी मोटर्सने ७ मार्च रोजी भारतीय देशांतर्गत बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही एसजी झेडएस इव्हीची फेसलिफ्ट व्हेरियंट लाँच केलं आहे. नव्या गाडीमध्ये रेंज व्यतिरिक्त ७५ कार कनेक्टेड फिचर्स दिले आहेत. एमजी मोटर्सने याआधी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सिंगल ट्रिमसह लाँच केली होती. परंतु कंपनीने फेसलिफ्ट व्हेरियंट एमजी ZS EV 2022 दोन प्रकारांसह लाँच केली आहे. Excite आणि Exclusive असे दोन प्रकार आहेत. चार्जिंगची समस्या पाहता कंपनीने ही एसयूव्ही पाच प्रकारे चार्ज करण्याचा पर्याय दिला आहे. बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात ५०.३ KWH क्षमतेची हाय-टेक बॅटरी आहे आणि तिच्यासोबत दिलेली मोटर १७६.७५ पीएस पॉवर आणि २८० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कारच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही गाडी पूर्ण चार्ज केल्यानंतर ४६१ किमीची रेंज देते. या पाच चार्जिंग पर्यायांमध्ये पहिला पर्याय ऑनबोर्ड चार्जिंग केबल, दुसरा एसी चार्जिंगसाठी (घर आणि ऑफिस), तिसरा पर्याय एमजी डीलरशिपवर डीसी फास्ट चार्जर, चौथा पर्याय सार्वजनिक चार्जिंग आणि पाचवा पर्याय म्हणजे आपत्कालीन रोड साइड चार्जिंग असे आहेत. त्याचबरोबर कंपनीने सुधारित फ्रंट फॅसिआ, बॉडी कलर क्लोज्ड पॅनल, नवीन डिझाइन बंपर इत्यादी बदल केले आहेत. कंपनीने ही गाडी आर्क्टिक व्हाईट, बॅटरसी ब्लू, मोन्युमेंट सिल्व्हर, डायनॅमिक रेड आणि पर्ल ब्लॅक कलरसह पाच रंगसंगतींमध्ये सादर केली आहे.

एमजी ZS EV 2022 च्या स्पीडबाबत कंपनीचा दावा आहे की ही एसयूव्ही फक्त ८.२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग मिळवू शकते. गाडीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्यात अपडेटेड १०.१-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. वायरलेस चार्जिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांशिवाय ७५ कार कनेक्टेड फीचर्स जोडण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कंपनीने त्यात ६ एअरबॅग्ज, हिल डिसेंट कंट्रोल, ईएससी, रीअर ड्राइव्ह असिस्ट, ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये जोडली आहेत.

Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Aviation Turbine Fuel price
Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग
north koreal ballistic missile test
हुकूमशाह किम जोंग उनने केली जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्राची चाचणी? काय आहे उत्तर कोरियाकडील आयसीबीएम?
Commercial LPG Cylinder Price Hike by Rs 62
LPG Gas Cylinder : ऐन दिवाळीत व्यावसायिक सिलिंडर ६२ रुपयांनी महाग, घरगुती सिलिंडरच्या दरांची स्थिती काय?
TPG Nambiar
‘बीपीएल’चे संस्थापक टीपीजी नांबियार यांचे निधन
पेट्रोल पंपचालकांची दिवाळी यंदा गोड! सरकारकडून कमिशनमध्ये वाढ; भाववाढ नसल्याने ग्राहकांनाही दिलासा
Maruti Suzuki Dzire 2024
Maruti Suzuki Dzire 2024 : दिवाळीनंतर नवी डिझायर येतेय ग्राहकांच्या भेटीला! जाणून घ्या हटके डिझाइन अन् भन्नाट फीचर्स

कंपनीने ही कार २१,९९,८०० रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किंमतीसह लाँच केली आहे. टॉप वेरिएंटवर २६ लाखांपर्यंत जाते. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार MG ZS EV 2022 चे बेस व्हेरिएंट जुलै २०२२ पासून डीलरशिपवर उपलब्ध होईल. लाँच केल्यानंतर गाडी थेट टाटा Nexon EV आणि ह्युंदाई Kona शी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे.