एमजी मोटर्सने ७ मार्च रोजी भारतीय देशांतर्गत बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही एसजी झेडएस इव्हीची फेसलिफ्ट व्हेरियंट लाँच केलं आहे. नव्या गाडीमध्ये रेंज व्यतिरिक्त ७५ कार कनेक्टेड फिचर्स दिले आहेत. एमजी मोटर्सने याआधी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सिंगल ट्रिमसह लाँच केली होती. परंतु कंपनीने फेसलिफ्ट व्हेरियंट एमजी ZS EV 2022 दोन प्रकारांसह लाँच केली आहे. Excite आणि Exclusive असे दोन प्रकार आहेत. चार्जिंगची समस्या पाहता कंपनीने ही एसयूव्ही पाच प्रकारे चार्ज करण्याचा पर्याय दिला आहे. बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात ५०.३ KWH क्षमतेची हाय-टेक बॅटरी आहे आणि तिच्यासोबत दिलेली मोटर १७६.७५ पीएस पॉवर आणि २८० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कारच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही गाडी पूर्ण चार्ज केल्यानंतर ४६१ किमीची रेंज देते. या पाच चार्जिंग पर्यायांमध्ये पहिला पर्याय ऑनबोर्ड चार्जिंग केबल, दुसरा एसी चार्जिंगसाठी (घर आणि ऑफिस), तिसरा पर्याय एमजी डीलरशिपवर डीसी फास्ट चार्जर, चौथा पर्याय सार्वजनिक चार्जिंग आणि पाचवा पर्याय म्हणजे आपत्कालीन रोड साइड चार्जिंग असे आहेत. त्याचबरोबर कंपनीने सुधारित फ्रंट फॅसिआ, बॉडी कलर क्लोज्ड पॅनल, नवीन डिझाइन बंपर इत्यादी बदल केले आहेत. कंपनीने ही गाडी आर्क्टिक व्हाईट, बॅटरसी ब्लू, मोन्युमेंट सिल्व्हर, डायनॅमिक रेड आणि पर्ल ब्लॅक कलरसह पाच रंगसंगतींमध्ये सादर केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा