देशात अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो.खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात घडतात. काही अपघात इतके भीषण असतात की कायमचं अपंगत्व येतं. यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी पावलं उचलताना दिसत आहे. चारचाकी वाहनांमध्ये थ्री पॉइंट बेल्ट आणि सहा एअरबॅग्सचा प्रस्ताव पुढे केल्यानंतर दुचाकीसाठी नवे नियम तयार केले आहेत. चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी नियमावली आखली आहे. आता रस्ते व वाहतूक मंत्रालयाने मोटार अपघात दावे लवकर निकाली लागावे यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन नियमाने तपशीलवार तपासणी, अपघात अहवाल (DAR) आणि रस्ते अपघातांच्या अहवालासह दावे लवकर निकाली लागावे यासाठी वेळ निश्चित केली आहे. नव्या नियमाबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वाहन विम्याच्या प्रमाणपत्रात वैध मोबाइल क्रमांक समाविष्ट करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील.
अपघाती दावा निकाली काढण्यासाठी नवीन नियम, आता वाहन विम्यासाठी द्यावी लागणार ‘ही’ माहिती
रस्ते व वाहतूक मंत्रालयाने मोटार अपघात दावे लवकर निकाली लागावे यासाठी नवीन नियम जारी केले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-03-2022 at 10:34 IST
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministry notified new rules on road accidents for faster settlement insurance claims rmt