Top 10 Car Exports May 2023: वाढत्या महागाईचा परिणाम भारतातच नाही तर परदेशातही दिसून येत आहे. त्यामुळेच मे महिन्यात वाहनांच्या निर्यातीत घट झाली आहे. गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या निर्यातीत ६.४२ टक्क्यांची घट झाली असून एकूण ५३,२३७ वाहने परदेशात पाठवण्यात आली आहेत. जर आपण सर्वाधिक निर्यात होणाऱ्या कारबद्दल बोललो, तर या प्रकरणात मारुतीच्या स्वस्त कारने इतर सर्वांचा पराभव केला आहे. सर्वाधिक विक्री होणारी मारुती बलेनो आणि मारुती स्विफ्टही या वाहनासमोर फिक्या पडल्या आहेत. चला तर पाहूया कोणत्या आहेत या कार…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ कारची परदेशातही झाली जबरदस्त विक्री

  • मे महिन्यात Maruti Spresso ची सर्वाधिक निर्यात झाली आहे. त्याची ५,९२५ युनिट्स परदेशात पाठवण्यात आली आहेत. तर १ वर्षापूर्वी म्हणजेच मे २०२२ मध्ये त्यातील केवळ ३,६९२ युनिट्सची निर्यात झाली होती. अशा प्रकारे, Spressoच्या निर्यातीत थेट ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. Spressoची भारतात किंमत ४.२ लाख रुपयांपासून सुरू होते.
  • Hyundai Xcent या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ५,१९८ युनिट्सची निर्यात केली आहे. मारुती बलेनो तिसऱ्या तर Maruti Celerio चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही कारच्या अनुक्रमे ४,९१० युनिट्स आणि ३,४१३ युनिट्स विदेशात निर्यात केल्या आहेत. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की Celerioच्या निर्यातीत १५० टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • त्याचप्रमाणे Volkswagen Virtus पाचव्या क्रमांकावर होती, ज्यांच्या ३,०९९ युनिट्स परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. सहाव्या क्रमांकावर Maruti Suzuki Dzire आणि सातव्या क्रमांकावर Kia Sonet आहे. त्याचप्रमाणे, Maruti Suzuki Ertiga या यादीत आठव्या स्थानावर, Maruti Swift नवव्या स्थानावर आणि Kia Seltos दहाव्या स्थानावर आहे. एर्टिगाच्या निर्यातीत २३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर स्विफ्टमध्ये ६० टक्क्यांनी घट झाली आहे.
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Models from the maruti suzuki stables commanded six positioned out of the top 10 cars exported in may 2023 pdb
First published on: 27-06-2023 at 14:03 IST