Monsoon bike riding Tips: सध्या राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत असून साचलेल्या पाण्यामुळे बाईक, कार यांसारखी विविध वाहने पाण्यात अडकली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात बाईक आणि कारच्या मालकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या दिवसात घराबाहेर पडण्यापूर्वी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील टिप्सचे अवश्य पालन करा.

पावसाळ्यात बाईकचालकांनी अशी घ्या काळजी (Monsoon bike riding Tips)

वॉटरप्रूफिंग

Palghar Police conducts special awareness campaign on the occasion of Road Safety Week
शहरबात: रस्ते आणि सुरक्षा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Due to the rickshaw bandh movement, the commuters who went out for work suffered.
नालासोपाऱ्यात रिक्षा चालकांचे चार तास रिक्षाबंद आंदोलन, प्रवाशांचे हाल
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री
Bike Driving Tips
Bike Driving Tips : जर प्रत्येक दुचाकी चालकाने ‘या’ पाच सवयी लावल्या तर कधीही होणार नाही अपघात
Screen Time Social Media YouTubers and Influencers
वखवख तेजाची न्यारी दुनिया…
Tips for a Safe Ride
हिवाळ्यात बाईक रायडिंग करण्यापूर्वी ‘या’ टिप्स नक्की वाचा; नाहीतर उद्भवतील अनेक समस्या
Traffic car driving
दररोज ट्रॅफिकमध्ये गाडी अडकते? मग ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

पावसाळ्यात वॉटरप्रूफ गियर खरेदी करणं ही चांगली कल्पना आहे, पण हे खूप महाग असू शकते. तुमचे बजेट कमी असल्यास, तुमच्या नियमित राइडिंग गियरवर बसणारे रेन गियर खरेदी करा. तसेच तुमचे रेनवेअर सैल असणेदेखील आवश्यक आहे, जेणेकरून ते बाईकच्या हालचालीत अडथळा आणत नाही. खराब हवामानामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत तुम्ही बाईक चालवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता.

वॉटरप्रूफ शूज घाला

पावसाळ्यात बाईक चालवताना बऱ्याचदा शूजकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या दिवसांत बाईकवरून प्रवास करताना वॉटरप्रूफ शूज खरेदी करा.

देखभाल

तुमचा व्हिझर ओला किंवा घाणेरडा असल्यास तो स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ, कोरडे मायक्रोफायबर कापड बरोबर घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. जर तो खराब झाला असेल तर एका कापडाने पुसण्यापूर्वी त्याला पाण्याने साफ करून घ्या. जर तुम्ही तसे केले नाही, तर तुमचा व्हिझर स्क्रॅच होण्याचा धोका आहे.

उत्तम नियंत्रण

पावसाळ्यात बाईक चालवताना अचानक होणारी कोणतीही कृती टाळा. शक्य तितके थ्रॉटल वेगाने उघडू नका, अचानक जोरात ब्रेक दाबू नका किंवा बाईक वेगाने चालवू नका. या दिवसात बाईक चालवताना नियंत्रण ठेवल्यास कोणताही धोका उद्भवत नाही.

स्पीड कमी ठेवा

पावसाळ्यातील सुरुवातीचा पाऊस खूप धोकादायक असतो, कारण या पावसात रस्त्याच्या पृष्ठभागावरून तेल आणि घाण बाहेर पडते, ज्यामुळे रस्ता निसरडा होतो. त्यामुळे पावसाळ्यात वेग सामान्यपेक्षा कमी ठेवण्याची शिफारस केली जाते.

हेडलाइट्स चालू ठेवा

पावसाळ्याच्या दिवसात ढगाळ वातावरण असते, त्यामुळे या दिवसात पाऊस पडत नसला तरीही तुमच्या बाईकचा हेडलाइट चालू ठेवून बाईक चालवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील अंधुकपण कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा: कारमध्ये पावसाचे पाणी गेल्यास काय कराल? ‘या’ टिप्स करा फॉलो

अंतर राखा

बाईक चालवताना लक्षात ठेवा की, तुमच्यापुढे असलेल्या वाहनांपासून तुम्ही नेहमीपेक्षा जास्त अंतर ठेवा. हे तुम्हाला गती कमी करण्यासाठी अतिरिक्त जागा देते.

Story img Loader