पावसाळ्यात वाहन काळजीपूर्वक चालवणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण याच ऋतूमध्ये अपघात होण्याचे आणि गाडी खराब होण्याचे प्रमाण जास्त असते. असे म्हणतात ज्याला क्लच, ब्रेक आणि स्पीड पॅडल यांच्यातील ताळमेळ सांभाळणे जमले, तो अतिशय चांगली गाडी चालवू शकतो. गाडी चालवताना क्लच कधी आणि किती द्यावा यालाही महत्त्व आहे. याचा सरळ संबंध कारच्या इंजिन आणि मायलेजशी असतो.

मात्र, असेही काही लोक असतात जे अनेकदा विनाकारण क्लचचा वापर करतात. यामुळे क्लच खराब होऊन याचा परिणाम कारच्या इंजिनवर आणि परफॉर्मन्सवर पडतो. बहुतेकदा गाडी चालवताना आपण अनेक चुका करत असतो. आज आपण अशा काही चुका आणि त्या दुरुस्त करण्यासाठीच्या टिप्सबद्दल जाणून घेऊया. यामुळे क्लच आणि कार दोघांचेही आयुष्य वाढू शकते.

Car Care Tips for Rainy Season: पावसाळ्यात तुमच्या गाडीची घ्या खास काळजी; ‘या’ टिप्सची होईल मदत

  • विनाकारण क्लच दाबून ठेवणे

गीअर्स बदलताना, क्लच दाबा. पण अनेकांना सवय असते की गीअर्स बदलल्यानंतरही ते क्लचवर पाय ठेवतात. यामुळे क्लचवर अनावश्यक दबाव पडतो आणि त्याचा परिणाम इंजिनवर होतो. बऱ्याच कार्समध्ये क्लचच्या बाजूला पाय ठेवण्याचीही जागा असते, जेणेकरून क्लचचा वापर करून झाल्यावर आपण आपला पाय क्लचवर न ठेवता त्या मोकळ्या जागेत ठेवावा.

  • रस्त्यावर उभी असलेल्या कारमधील क्लच दाबून ठेवणे

ज्या शहरांमध्ये ट्रॅफिक सिग्नल खूप जवळ आहेत, त्या ठिकाणी, बहुतेक कार चालक सिग्नलचा रंग हिरवा होईपर्यंत त्यांच्या वाहनाचा क्लच दाबून ठेवतात. यावेळी कार न्यूट्रल गियरवर असते, त्यामुळे क्लच दाबण्याची गरज नाही.

  • उंचीवर असताना क्लच आणि एक्सीलरेटरचा जास्त वापर

डोंगराळ भागात किंवा चढाईच्या ठिकाणी, आपण पाहिले असेल की अनेक वाहने उष्णतेमुळे गरम होतात आणि थांबतात. काही वाहने तापतात आणि धूर सोडतात. याची काळजी न घेतल्यास या स्थितीत कारलाही आग लागू शकते. क्‍लच आणि एक्‍सेलेटरच्‍या अतिवापरामुळे असे अनेकदा घडते. चढाईच्या क्षेत्रात, तुम्ही मुख्यतः ब्रेक्स आणि एक्सीलरेटरचा वापर करावा.