भारतातील सर्वांत मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने भारतीय वाहन बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकतेच या कंपनीने भारतीय बाजारात ‘ग्रँड विटारा’ आणि त्याआधी ‘न्यू ब्रेझा’ ही गाडी लाँच केली होती. या दोन्ही गाड्यांचे बुकिंग सुरू असून ग्राहकांना या दोन्ही एसयूव्ही गाड्या खूप आवडल्या आहेत. आतापर्यंत ग्रँड विटारा आणि न्यू ब्रेझा या दोन्ही एसयूव्हींचे दोन लाखांपेक्षा जास्त बुकिंग झाले आहे. मारुती सुझुकीने या दोन्ही गाड्यांच्या बळावर भारतीय बाजारात या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ग्राहकांनाही या दोन्हीं गाड्या खूप आवडल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मारुती सुझुकीच्या विक्रीत वर्षभरात ३८ टक्के वाढ

या दोन्ही एसयूव्हीच्या बुकिंगमुळे कंपनीने दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतची सर्वाधिक विक्रीही नोंदवली. मारुती सुझुकी इंडियाने दुसऱ्या तिमाहीत ५ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली. त्यामुळे विक्रीत वर्षभरात ३८ टक्के वाढ झाली आहे. तसेच, या एसयूव्ही व्यतिरिक्त, कंपनीने भारतात इतर अनेक मॉडेल लॉन्च केले आहेत, ज्यामुळे विक्री वाढली आहे. अलीकडे लाँच झालेल्या काही मॉडेल्समध्ये २०२२ मारुती सुझुकी बलेनो, नवीन मारुती सुझुकी अल्टो K10, फेसलिफ्टेड एर्टिगा तसेच इतर मॉडेल्सच्या सीएनजी आवृत्त्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा : BMW ची ‘X6 50 Jahre M Edition’ भारतात लाँच; जबरदस्त मायलेज, पाहा किंमत आणि फिचर्स…

  • मारुती सुझुकी ग्रँड विटारा

मारुती सुझुकी ग्रँड विटारा टोयोटा अर्बन क्रूझर हायब्रीड एसयूव्हीवर आधारित आहे, त्यामुळे त्यात साम्य दिसून येईल पण त्यात काही अतिरिक्त वैशिष्ट्ये देखील समाविष्ट करण्यात आली आहेत. गाडीत उभ्या-स्‍प्लिट हेडलँपसह एक नवीन फ्रंट एंड पाहायला मिळेल जो समान फरकाने मागील बाजूस जातो. नुकत्याच लाँच झालेल्या सर्व मारुति सुझुकी कार्सप्रमाणे, ग्रँड विटारा हेड-अप डिस्प्ले, मोठा पॅनोरॅमिक सनरूफ, ३६०-डिग्री पार्किंग कॅमेरा, ९-इंच इंफोटेनमेंट यासह प्रीमियम वैशिष्ट्यांसह प्लश इंटीरियरसह येईल. सहा एअरबॅगसह टचस्क्रीन देखील देण्यात आली आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत १०.४५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि १९.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

  • २०२२ मारुती सुझुकी ब्रेझा

२०२२ मारुती सुझुकी ब्रेझाला १.५-लिटर चार-सिलेंडर K15C सौम्य-हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळते जे १०३ PS कमाल पॉवर आउटपुट आणि १३७ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. नवीन ब्रेझामध्ये पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत बाह्य आणि आतील भागात बरेच बदल करण्यात आले आहेत. हे ५-स्पीड MT किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर AT शी जोडलेले आहे. या कारची किंमत ७.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि १३.८० लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Story img Loader