Best 7 Seater Car in India: जेव्हा जेव्हा सर्वात स्वस्त सात-सीटर एमपीव्हीचा विचार केला जातो, तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात मारुती सुझुकी एर्टिगा हे नाव येते. परंतु, भारतीय बाजारपेठेत Ertiga पेक्षा अधिक परवडणारी MPVs उपलब्ध आहेत, हे तुम्हाला माहितेय का, जरी ती कार फारशी लोकप्रिय नसली तरी ज्यांना स्विफ्ट किंवा ग्रँड i10 Nios सारख्या ५-सीटर हॅचबॅकच्या किमतीच्या श्रेणीमध्ये ७-सीटर कार हवी आहे त्यांच्यासाठी ही कार एक चांगला पर्याय ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही कार…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ही’ आहे भारतातली सर्वात स्वस्त Family Car

Renault Triber असे या ७ सीटर कारचे नाव असून या कारची किंमत ६.३३ लाख पासून सुरू होते आणि ८.९७ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते, तर Maruti Ertiga ची किंमत ८.६४ लाख रुपयांपासून सुरू होते. म्हणजेच ट्रायबरच्या टॉप व्हेरियंटची किंमत एर्टिगाच्या बेस व्हेरियंटच्या किमतीच्या जवळपास आहे, त्यात फक्त काही हजार रुपयांचा फरक आहे. ट्रायबर एकूण चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ या वेरिएंट्सचा समावेश आहे.

पॉवरफुल इंजिन

या कारमध्ये १.० लिटर, नॅच्युरली एस्पीरेटेड, ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन ऑफर करण्यात आले आहे. हे इंजिन ७२PS/९६NM आऊटपुट जनरेट करते. या कारमध्ये ८४ लिटरचे बूट स्पेस, ८ इंचांचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्टिअरिंग-माउंटेड कंट्रोलस, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, ६-वे अॅडजस्टेड ड्रायव्हर सीट आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प सारखे फीचर्स मिळतात.

(हे ही वाचा : सर्वाधिक विक्री होणाऱ्या देशातल्या सर्वात स्वस्त कारकडे आता ग्राहकांनी फिरविली पाठ? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण)

वैशिष्ट्ये

यात स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स (संगीत आणि फोन), दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेसाठी एसी व्हेंट्स, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, सेंटर कन्सोल आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये कूल्ड स्टोरेज, चार एअरबॅग्ज (समोर आणि बाजूला), EBD सह ABS, मागील पार्किंग मिळते. सेन्सर आणि रियर व्ह्यू कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत.

मायलेज

रेनॉ ट्रायबरच्या लोकप्रियतेमागचं प्रमुख कारण म्हणजे तिची साईज, सीटिंग क्षमता आणि तिची परवडणारी किंमत. विशेष म्हणजे ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत देखील उत्तम आहे. तुमचं कुटुंब या कारमधून प्रवास करताना बऱ्यापैकी सुरक्षित आहे. ही कार २० किमी पर्यंत मायलेज देऊ शकते.