Best Budget Bikes with good Mileage: भारतीय बाजारपेठेत अनेक स्वस्त आणि चांगल्या बाइक्स उपलब्ध आहेत. सध्या भारतीय बाजारपेठेत बजेट फ्रेंडली बाइक्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. या बाइक्स फक्त स्वस्तच नाहीत, तर मायलेज आणि फीचर्सच्या बाबतीतही उत्कृष्ट आहेत. कमी किंमत, जबरदस्त मायलेज व मेंटेनन्स खर्च कमी असल्याने अशा बाइक्सची खूप विक्री होते. तुम्ही तुमच्या घरी नवीन बाईक आणण्याचा विचार करीत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण- या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमच्यासाठी चांगल्या आणि परवडणाऱ्या कोणत्या बाइक्स आहेत. चला तर, मग भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या स्वस्त बाइक्स कोणत्या आहेत ते जाणून घेऊ…

देशातील सर्वात स्वस्त बाईकची ‘ही’ पाहा यादी

बजाज CT110X

बजाजची CT110X तिच्या बोल्ड लूकमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. ही बाईक किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टने सुसज्ज आहे. बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. ही बाईक एक लिटरमध्ये ७०-७२ kmpl मायलेज देऊ शकते. बाईकची एक्स-शोरूम किंमत ६७,३२२ रुपये आहे.

हिरो HF100

Hero MotoCorp ची HF 100 ही परवडणारी आणि टिकाऊ बाईक आहे. ARAI नुसार, ही बाईक ८३ kmpl पर्यंत मायलेज मिळवू शकते. एक्स-शो रूम किंमत ५४,९६२ रुपयांपासून सुरू होते.

टीव्हीएस स्पोर्ट्स

ही बाईक स्पोर्टी डिझाइनमध्ये येते. त्यात ११०cc इंजिन आहे जे ८.२९PS पॉवर आणि ८.७Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. TVS स्पोर्ट एका लिटरमध्ये ११०.१२ kmpl मायलेज देते. बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रतितास आहे. TVS स्पोर्टची किंमत ६१,५०० रुपयांपासून सुरू होते.

2025 Honda Shine 100

Honda कंपनीच्या बाईक्स देशात सर्वाधिक विकल्या जातात. आता कंपनीने नुकतीच 2025 Honda Shine 100 बाईक लाँच केली आहे. शाइन १०० मध्‍ये दोन्‍ही बाजूस ड्रम ब्रेक्‍ससह सीबीएस (कम्‍बाइन्‍ड ब्रेकिंग सिस्‍टम) आहे. या मोटरसायकलमध्‍ये ९८.९८ सीसी, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्‍ड, फ्यूएल-इंजेक्‍टेड इंजिनची शक्‍ती आहे. हे इंजिन ७५०० आरपीएममध्‍ये ५.४३ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि ५००० आरपीएममध्‍ये ८.०४ एनएम टॉर्क देते. इंजिनबरोबर ४-स्‍पीड गिअरबॉक्‍स आहे. ही मोटरसायकल सिंगल व्‍हेरिएण्‍टसह पाच रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे. या बाईकची किंमत ६८,७६७ रूपये (एक्‍स-शोरूम, दिल्‍ली) आहे.

TVS XL100

TVS मोपेड बाईक XL100 ला खूप पसंत केली जात आहे. ही बाईक वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी वापरली जाते. उत्तर प्रदेशमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत ३९,९०० रुपयांपासून सुरू होते. ही बाईक ८० किलोमीटर इतका मायलेज देते.