The most affordable BMW bike: जर्मन वाहन उत्पादक कंपनी BMW Motorrad बाजारपेठेत त्यांच्या चाहत्यांसाठी नवनवीन उत्पादने बाजारात घेऊन येत असते. BMW च्या बाईक लक्झरी, शक्तिशाली आणि आकर्षक दिसणाऱ्या तसेच सर्वोत्तम बाइक्ससाठी ओळखली जातात. बीएमडब्ल्यू या कंपनीचं नाव ऐकल्यावर, आपल्या डोळ्यासमोर लग्झरी कार आणि महागड्या स्पोर्ट्स बाईक येतात. कंपनी जगभर महागडी वाहनं विकते. जर्मन दुचाकी कंपनीच्या बाईकही भारतीय बाजारपेठेत खूप पसंत केल्या जातात. पण BMW च्या बाईक फार महागड्या असल्या कारणानं सर्वसामान्य लोकांना ते घेणे परवडत नाही. मात्र, भारतीय बाजारात स्वस्त बाईक उपलब्ध आहे, हे तुम्हाला माहिती आहे का, खरंतर हा भारतीय ग्राहकांसाठी सुखद धक्काच आहे. चला तर आज आपण देशातील स्वस्त BMW बाईक कोणती तिचे फीचर्स कोणते याविषयी जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील सर्वात स्वस्त BMW मोटरसायकल BMW G 310 R आहे. ही बाईक बाजारपेठेत KTM 390 Duke, Royal Enfield Interceptor 650 आणि Honda CB300R सारख्या बाइक्सना जोरदार टक्कर देते. ही मोटरसायकल फक्त एकाच प्रकारात उपलब्ध आहे. यात ३१३cc, लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे ३४PS आणि २८NM जनरेट करते. यात ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. त्याची इंधन टाकी ११ लिटर क्षमतेची आहे. ० ते १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त ८.०१ सेकंदात मिळवते. BMW G 310 R च्या सीटची लांबी ८११ मिमी आहे. बाईकचा इनर कर्व्ह १८३० मिमी आहे. बाईकमध्ये ११ लिटरचा युझेबल फ्युअल टँक देण्यात आलाय. शिवाय बाईकमध्ये अॅल्युमिनिमची व्हिल्स देण्यात आले आहेत.

(हे ही वाचा : बाकी कंपन्याची उडाली झोप, बजाजच्या ‘या’ २ बाईकवर अख्खा देश फिदा; १ महिन्यात ३० लाखाहून अधिक दुचाकींची विक्री)

यात पुढील बाजूस ४१ मिमी अपसाइड डाउन (USD) टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन आहे तर मागील बाजूस प्रीलोड समायोजनासह मोनोशॉक सस्पेंशन आहे. यात ड्युअल चॅनल एबीएस आहे. पुढील आणि मागील बाजूस अनुक्रमे ३०० मिमी आणि २४० मिमी सिंगल डिस्क ब्रेक आहेत. यात १७-इंच अलॉय व्हील आहेत.

BMW G 310 R ची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या बीएमडब्ल्यू बाइकमध्ये सिंगल फ्रंट डिस्क ब्रेक सिस्टिम देण्यात आली आहे. यात ऑल एलईडी लायटिंग, रियर प्री-लोड अॅडजस्टेबल सस्पेंशन, अपसाइड डाउन फोर्क सस्पेन्शन, रेडियल फ्रंट ब्रेक कॅलिपरसह मोठा डिस्प्ले देण्यात आला. तुम्ही ही बाइक ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता.

किंमत किती?

BMW G 310 R या बाईकची किंमत २.९० लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most affordable bmw bikes bmw motorrad had launched their cheapest motorcycle g 310 r pdb