BMW XM Label Beemer : आपल्याकडे एक BMW कार असावी असे अनेकांचे स्वप्न असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बीएमडब्लू कार फार आवडते. भारतात BMW कार्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनीने आता भारतात एक नवीन हटके मॉडल लाँच केले आहे. XM लेबल एडिशन नावाची या नवीन बीमरची किंमत ३.२५ कोटी रुपये आहे. आज आपण BMW XM लेबल कारच्या फीचर्सविषयी जाणून घेऊ या.

  • BMW XM लेबल कारला फ्रोजन कार्बन ब्लॅक मेटॅलिक एक्सटीरियर पेंट स्कीम मध्ये रॅप केले आहे. ज्याला काही ठिकाणी लाल रंगाच्या एक्सेंटद्वारे पूर्ण केले आहे. लाल हायलाइट ब्लॅक-आउट किडनी ग्रिल, रियर डिफ्यूज़र आणि विंडो लाइनच्या जवळपास दिसून येते. ही कार २२-इंच एम लाइट अलॉय व्हिल्स वर चालते ज्याला रेड ब्रेक कॅलिपर्स द्वारे हायलाइट करण्यात आले आहे.
  • XM लेबल कारचा आतील भाग अतिशय आकर्षक व स्पोर्टी लूक देतो. इंटीरिअरमध्ये आकर्षक लाल रंगाबरोबर सुंदर ब्लॅक अपहोल्स्ट्री, दोन-टोन सीट्स, बोल्ड रेड आणि स्लीक ब्लॅक रंगांचे मिश्रण करण्यात आले आहे. BMW च्या सिग्नेचर कर्व्ड डिस्प्लेचा तुम्ही लाभ घेऊ शकता ज्यामध्ये १४.९ -इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि १२.३ इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे.

हेही वाचा : Triumph Speed ​​T4 झाली भारतात लॉंच; हाय-टेक फिचर्ससह देणार दमदार परफॉर्मन्स, किंमत फक्त…

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 kartik aaryan starr movie lead over ajay devgn starr movie on third saturday
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
  • या कारच्या प्रिमियम फीचर्स मध्ये नेविगेशनसाठी हेड-अप डिस्प्ले, २०-स्पीकर बोवर्स आणि विल्किंस डायमंड साउंड सिस्टम आणि हँडलिंग आणि राइड कम्फर्टसाठी अॅडेप्टिव एम सस्पेंशन प्रोफेशनल समाविष्ट आहे.
  • XM लेबलची सर्वात मोठी विशेषत:म्हणजे फ्लॅगशिप BMW मध्ये प्लग-इन हायब्रिड पावरट्रेन आहे ज्यामध्ये ४.४ लीटर V8 ट्विन-टर्बो पेट्रोल इंजिन आहे आणि एक इलेक्ट्रिक मोटार आहे. IC इंजिन ५८० bhp आणि ७२० Nm चा पीक टॉर्क निर्माण करतो दूसरीकडे इलेक्ट्रिक मोटार २५.७ kW लिथियम-आयन बॅटरीपासून ऊर्जा निर्माण करतो जो ४५ kW (१८५ bhp) आणि २८० Nm चा आउटपुट देतो.
  • संपूर्ण सिस्टमचा एकूण पीक आउटपुट ७४० bhp आणि १०० Nm चा टॉर्क आहे. बॅटरी ७६ ते ८२ किमी पर्यंत इलेक्ट्रिक ड्रायव्हिंग रेंज देते. ८-स्पीड M स्टेप्ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या माध्यमातून ते सर्व चार चाकांना पावर ट्रान्सफर करते.
  • BMW XM इलेक्ट्रॉनिक २५० किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते. ड्रायव्हरनुसार २९० किमी प्रति तासांपर्यंत ही रेंज वाढवली जाऊ शकते. सुपर एसयूव्ही ३.८ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तासाच्या वेग पकडू शकते. या BMW मध्ये कॉम्प्लीमेंट्री वॉलबॉक्स चार्जर सुद्धा देण्यात आला आहे.