Motor Vehicle Act: भारतात किंवा इतर कोणत्याही देशात रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. पण, प्रत्येक देशात लायसन्स मिळवण्यासाठीचे नियम वेगवेगळे आहेत. या नियमांची पूर्तता केल्यानंतरच परवाना दिला जातो. साधारणपणे बहुतेक देशांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी १८ वर्ष पूर्ण असण्यासाठी अट आहे. भारतातही १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर ड्रायव्हिंस लायसन्स मिळवता येते. पण, असे एक ड्रायव्हिंग लायसन्स आहे जे तुम्ही वयाच्या १६ वर्षातही मिळवू शकता. हे लायसन्स फक्त गियरलेस वाहन (स्कूटी) चालवण्यासाठी दिले जाते. आज याच लायसन्सबद्दल आपण जाणून घेऊ…

मोटार वाहन कायदा १९८८ नुसार वयाच्या १६ व्या वर्षीही ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येते. पण, त्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागते. जर आपण या लायसन्सची तुलना केली तर ते एकप्रकारे लर्नर लायसन्ससारखेच असते. कारण हे लायसन्स घेतल्यानंतर तुम्ही विशिष्ट प्रकारचे वाहनच चालवू शकता.

Baba Siddique Links With Dawood What Nana Patole says
‘बाबा सिद्दिकी यांचे दाऊदशी संबंध’, लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक दावे; तर नाना पटोले म्हणतात, ‘दाल मे कुछ काला’
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
help prevent car theft
कार चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स करतील मदत
Ladki Bahin Yojana Suspend
Ladki Bahin Yojana : निवडणूक आयोगाचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारला महत्त्वाचे निर्देश!
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार? या प्रश्नावर शरद पवार स्पष्टच बोलले…
Atpadi 500 rupees, Sangli Atpadi city ,
VIDEO : ओढ्यात वाहून आल्या चक्क ५०० रुपयांच्या नोटा! पैसे हुडकण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी
Election Commission of India holds a press conference in Delhi. Dates for Assembly elections in Jharkhand and Maharashtra
Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana Diwali Bonus
Ladki Bahin Yojana Diwali Bonus : लाडक्या बहिणींना खरंच अडीच हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार? नेमका शासन निर्णय काय?

मोटार वाहन कायदा १९८८ च्या चॅप्टर २ मधील मोटार वाहनचालकांच्या परवान्याच्या चौथ्या मुद्द्यात ही माहिती देण्यात आली आहे. यानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवता येत नाही. पण, परवाना मिळाल्यानंतर १६ वर्ष वयाच्या व्यक्तीला ५० सीसीपेक्षा कमी क्षमतेचे वाहन चालवता येते. पण, तो इतर कोणतेही वाहन त्या वयात चालवू शकत नाही, त्यासाठी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया सामान्य ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासारखीच आहे.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही RTO ऑफिसमध्ये जाऊन आधार कार्डची माहिती देऊन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरी तुम्ही परवान्यासाठी अर्ज करू शकता, पण तुम्हाला मोबाइल नंबर द्यावा लागेल, ज्यावर OTP येईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून प्राधिकरणाकडे शुल्क जमा केल्यानंतर तुम्ही लर्निंग लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकता.