Why Bike Does Not Use Diesel Engine: देशात बाईक चालकांची संख्या खूप जास्त आहे. कोट्यवधी लोक आपल्या दैनंदिन कामासाठी दुचाकीचा वापर करतात. शहरातच नव्हे तर गावातील प्रत्येक घरात आपल्याला बाईक दिसतील. पण तुम्ही कधी विचार केलाय का, बाईकमध्ये फक्त पेट्रोल इंजिन का दिले जाते आणि डिझेल इंजिन का दिले जात नाहीत? डिझेल तर स्वस्त इंधन आहे. मग का वापरत नाही, एकेकाळी बाजारात डिझेल इंजिन बाईक देखील उपलब्ध होत्या. पण नंतर बाईकमधून डिझेल इंजिन काढून टाकण्यात आले आणि फक्त पेट्रोल इंजिन दिले गेले. पण ते का काढण्यात आलं असावं, चला तर यामागचं नेमकं कारण काय, आज हे आपण समजून घेऊया…

बाईकमध्ये डिझेल इंजिन न वापरण्याची कारणे

आकार आणि वजन

डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिन पेक्षा मोठे असते आणि ते बाईक सारख्या छोट्या वाहनांवर बसवणेही एक आव्हानच आहे. याव्यतिरिक्त, डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनपेक्षा जड असतात, ज्यामुळे बाईकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

निर्मिती आणि कॉम्प्रेशन

पेट्रोल इंजिनपेक्षा डिझेल इंजिन अधिक जटिल आहेत. त्यांना बनवण्याचा खर्चही जास्त आहे, त्यामुळे बाईकची किंमतही वाढणार आहे. याशिवाय, डिझेल इंजिनचे कॉम्प्रेशन रेशो जास्त आहे, ज्यामुळे ते अधिक कंपन आणि अधिक आवाज निर्माण करते.

(हे ही वाचा: भारतीयांची आवडती बाईक महागणार, ४ दिवसांनंतर Hero च्या दुचाकीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार )

देखभाल

डिझेल इंजिन जास्त दाबाने काम करते, त्यामुळे डिझेल इंजिनमध्ये बिघाड होण्याचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिनला जास्त देखभाल करावी लागते. यामुळे बाईकचा मेंटेनन्स खर्च वाढू शकतो.

परफॉर्मन्स

डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त टॉर्क जनरेट करतात परंतु त्यांचा आरपीएम कमी असतो. त्यामुळे ज्या बाईकमध्ये हाय स्पीड किंवा जास्त परफॉर्मन्स आवश्यक असतो, जास्त आरपीएम आणि पॉवर आवश्यक असते, अशा स्थितीत डिझेल इंजिने चांगल परफॉर्मन्स करु शकत नाहीत.

प्रदूषण

डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनाच्या तुलनेत जास्त प्रदूषण करते जे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळेच आता इतर वाहनांमध्येही डिझेल इंजिन वापरले जात नाहीत अन् याच कारणामुळे दुचाकीमध्ये डिझेल इंजिन वापरले जात नाही.