URBN e Bike Price And Features : भारतात इलेक्ट्रिक कारप्रमाणे इलेक्ट्रिक दुचाकींची मागणीही झपाट्याने वाढत आहे. अनेक उत्तम इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट बाजारात दाखल होत आहेत. इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड ‘मोटोवोल्ट’ने नुकतीच नवीन ई-बाइक लाँच केली आहे. त्याला युआरबीएन इ-बाईक असे नाव देण्यात आले आहे. या बाईकचे मुख्य आकर्षण म्हणजे ही बाइक फक्त ९९९ रुपयांमध्ये बुक करता येते. ही बाईक पूर्ण चार्जमध्ये १२० किमीची रेंज देते. युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी ही बाईक तयार करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
युआरबीएन इ-बाईकचे फिचर्स
- या ई-बाईकची किंमत ४९,९९९ रुपये आहे.
- ही बाईक मोटोवोल्ट कंपनीच्या वेबसाइटवर आणि १००+ फिजिकल रिटेल पॉइंट्सवर ९९९ रूपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.
- तुम्ही ही बाइक इएमआयवर देखील खरेदी करू शकता.
- विशेष बाब म्हणजे ही बाइक चालवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लायसेन्स किंवा रेजिस्ट्रेशनची गरज नाही.
आणखी वाचा – Ola Electric : ओलाच्या एस१ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवर पहिल्यांदा मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या ऑफर
- मोटोवोल्ट युआरबीएन मध्ये रीमूवेबल बीआयएस अप्रूव्हड बॅटरी देण्यात आली आहे.
- कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी पूर्ण चार्ज असताना ही बाइक १२० किमी पर्यंतची रेंज देईल.
- याशिवाय यात इग्निशन की स्विच, हँडल लॉक, रियर आणि फ्रंट डिस्क ब्रेक्स आणि हायड्रॉलिक रिअर शॉकर्स हे फीचर्स देण्यात आले आहेत.
- याचे वजन ४० किलो आहे आणि त्याचा टॉप स्पीड २५ केएमपीएच आहे. याची बॅटरी चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात.
First published on: 28-09-2022 at 16:42 IST
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motovolt urbn electric bike can be booked in 999 rupees know features pns