Honda Elevate Suvs Sold : होंडा कार्स इंडिया ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी. होंडा कंपनीने आपली Elevate ही एसयूव्ही गेल्यावर्षी भारतात लॉन्च केली होती. त्यानंतर होंडा एलिव्हेट त्याच्या लाइनअपमध्ये प्रचंड पब्लिसिटी मिळाली. ऑटोमेकरने अलीकडेच अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये वर्षभरात या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची विक्री जवळपास ९० हजार युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. Honda Cars India ने नवीन जनरेशन Amaze sub-compact sedan लाँच करताना याचा खुलासा केला. होंडा एलिव्हेट सप्टेंबर २०२३ मध्ये लाँच करण्यात आली होती.
इंडियामध्ये ५० हजार Honda Elevate SUV ची विक्री
भारतात एलिव्हेटच्या सुमारे ५० हजार युनिट्सची विक्री झाली आहे, तर उर्वरित विक्री निर्यातीतून झाली आहे. Honda Elevate हे जपानमध्ये निर्यात होणारे पहिले मेड-इन-इंडिया मॉडेल आहे. ही कार WR-V म्हणून विकली जाते.
Honda Elevate: फीचर्स
होंडा एलिव्हेटच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये १०.२५ इंचाचा इन्फोटेनमेंट स्क्रीन, सात इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर आणि सिंगल पेन सनरूफ यासारखे फीचर्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत. तसेच यात स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, होंडा कनेक्ट आणि होंडा सेन्सिंग ADAS टेक अशी फीचर्सदेखील मिळतात.
यात मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील आणि स्वयंचलित हवामान नियंत्रणाची सुविधा आहे. यात ADAS, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन किपिंग असिस्ट, ऑटोमॅटिक हाय-बीम असिस्ट आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आहे.
हेही वाचा >> स्विफ्टची स्पेशल एडिशन मार्केटमध्ये लाँच; नजर हटणार नाही असा लूक; पाहा किंमत आणि जबरदस्त फीचर्स
Honda Elevate: इंजिन
होंडा एलिव्हेटमध्ये होंडा सिटीसारखेच १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ११९ बीएचपी आणि १४५ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन अनुक्रमे १५.३१ kmpl आणि १६.९२ kmpl च्या ARAI प्रमाणित इंधन कार्यक्षमतेसह ६ स्पीड मॅन्युअल किंवा सात स्पीड CVT युनिटसह जोडण्यात आले आहे.