Bike Maintenance: नियमित तुमच्या बाईकची व्यवस्थित काळजी घेतल्यास यामुळे बाईक दीर्घकाळ चांगली चालते आणि तुम्हाला सुरक्षितही ठेवते. तसेच यामुळे अचानक बिघाड होण्याची शक्यता कमी होते. पण, तुमच्या बाईकची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता? आम्ही सांगितलेल्या खालील सोप्या टिप्स बाईकला नेहमी चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
बाईकची अशी घ्या काळजी
ब्रेककडे लक्ष द्या
तुम्हाला आणि रस्त्यावरील इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रेक खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे ब्रेक खूप घट्ट किंवा सैल नसावेत, ब्रेक पॅड कालांतराने झिजतात आणि त्यामुळे ते बदलले पाहिजेत. तसेच ब्रेक फ्लुइडदेखील दर दोन महिन्यांनी बदलणे आवश्यक आहे.
बाईक मॅन्युअलकडे दुर्लक्ष करू नका
जेव्हा तुम्ही बाईक विकत घेता तेव्हा त्याच्यासह मॅन्युअलदेखील मिळते, जे आवर्जून वाचा आणि त्यातील नियम पाळा. कारण या मॅन्युअलमध्ये बाईकसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे तेल वापरायचे आहे, टायरची काळजी आणि इतर टिप्स याविषयी माहिती मिळू शकते.
एक जबाबदार चालक व्हा
बाईक चालवताना बाईकच्या देखभालीसह तुमच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. रॅश ड्रायव्हिंग, ओव्हर स्पीडिंग आणि रस्त्यावर स्टंट करण्याचा प्रयत्न करणे टाळा. यामुळे तुमच्या बाईकचे नुकसान होऊ शकते, तसेच यामुळे तुमचा आणि इतरांचा जीवदेखील धोक्यात येऊ शकतो. तसेच वाहतूक नियमांचे पालन करा, नियमांनुसार वेगमर्यादा राखा.
टायर्सची नियमित तपासणी करा
तुमच्या बाईक चालवण्याच्या पद्धतीनुसार टायर्सची स्थिती बदलते. कोणतेही नुकसान होण्यासाठी आणि त्यांना चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी तुम्ही नियमितपणे टायरचे ट्रेड तपासले पाहिजेत. जीर्ण झालेल्या ट्रेडसह बाईक चालवल्यास तुमची बाईक घसरू शकते. टायर्समध्ये हवेचा आवश्यक दाब आहे की नाही हेदेखील तपासा.
एअर फिल्टर्स स्वच्छ ठेवा
बाईकच्या एअर फिल्टर्सला वेळोवेळी साफसफाईची आवश्यकता असते, कारण त्यात धूळ आणि कचरा अडकतो. यामुळे इंजिनदेखील खराब होण्याची शक्यता असते. एअर फिल्टर्स स्वच्छ ठेवणे आणि काही काळानंतर बदलल्याने बाईकची कार्यक्षमता सुधारते.
हेही वाचा: हायवेवरील अपघातांपासून वाचण्यासाठी गाडी चालवताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
रोज या गोष्टींचे पालन करा
बाईक सुरू करण्यापूर्वी कोणतीही गळती होत नसल्याचे सुनिश्चित करण्यासाठी इंधन तपासा.
ब्रेक पेडलची तपासणी करा.
लाइट्स आणि हॉर्न तपासा.
टायर प्रेशर आणि टायर ट्रेड तपासा.