New BMW iX1 LWB Launched : BMW ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक नाव आहे. ही एक जर्मन कंपनी असून याची लोकप्रियता जगभरात पसरली आहे. BMW किंवा Audi सारख्या महागड्या गाड्या खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असते. तुम्हाला सुद्धा अशा लक्झरी गाड्या खरेदी करायची इच्छा आहे का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
BMW India ने ऑल-इलेक्ट्रिक iX1 LWB च्या किंमतीची घोषणा केली आहे. त्याच्या लांब व्हीलबेस ऑल-इलेक्ट्रिक eDrive20L M स्पोर्ट मॉडेलची किंमत ४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होत आहे. आज आपण BMW iX1 LWB या मॉडेलविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
BMW iX1 LWB EV: बॅटरी, रेंज आणि परफॉर्मन्स
कंपनीने iX1 LWB मध्ये ६६.४ kWh बॅटरी पॅक दिलेला आहे, ज्याची MIDC रेंज ५३१ किमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. २०४hp, २५० Nm फ्रंट एक्सल-माउंट मोटर SUV ला ८.६ सेकंदात ०-१००kph वेग वाढवण्यास मदत करते. DC फास्ट चार्जरवर बॅटरी पॅकला १३०kW पर्यंतच्या वेगाने चार्ज केला जाऊ शकतो
BMW iX1 LWB EV: आतील आणि बाहेरील डिझाइन
यात फ्रंट आणि रिअर मध्ये अॅग्रेसिव्ह डिझाइन केलेला बंप दिलेला आहे. यामध्ये 18-इंच एम अलॉय व्हिल्स प्रदान केले आहेत. फ्रंट हेडलाइट्समध्ये स्लिम ॲडॉप्टिव्ह एलईडी हेडलाइट्स, ‘किडनी’ ग्रिलसाठी मॅश पॅटर्न आणि 3D एलईडी टेल-लाइट्स दिलेले आहेत.
याची रुंदी मानक X1 सारखीच आहे, व्हीलबेस २८००mm वर ११२mm लांब आहे आणि एकूण लांबी ४,६१६ mm वर ११६ mm अधिक आहे. BMW X1 LWB पाच मेटॅलिक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – मिनरल व्हाइट, स्कायस्क्रॅपर ग्रे, एम कार्बन ब्लॅक, एम पोर्टिमाओ ब्लू आणि स्पार्कलिंग कॉपर ग्रे.
आतील बाजूस, X1 EV LWB मध्ये ड्रायव्हर-ओरिएंटेड ‘वाइडस्क्रीन वक्र डिस्प्ले’ असलेला एक डिजीटल १०.२५ -इंच इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि १०.७ -इंचाचा इन्फोटेनमेंट टचस्क्रीन सेटअप आहे.
या EV च्या फीचर हायलाइट्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, २८.५ अंशांपर्यंत झुकणाऱ्या मागील सीट्स आणि ४०:२०:२० स्प्लिट-फोल्डिंग फंक्शन, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, २०५W १२-स्पीकर हरमन कार्डन सिस्टम आणि वॅन्गान्झा लेदरेट अपहोल्स्ट्री यांचा समावेश आहे. सेफ्टी सूटमध्ये लेव्हल मध्ये 2 ADAS, पार्क असिस्ट फीचर, 8 एअरबॅग, ISOFIX अँकर आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचा समावेश आहे.