New Car Buying Guide: प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे एक चांगली चारचाकी कार असावी. तसेच भारतामध्ये कार खरेदी करणे ही एक विशेष प्रक्रिया आहे. नवीन कार घरी आणण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत तसेच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. नवीन कार खरेदी करणे ही खूप आनंदाची गोष्ट असते. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे, तुम्ही नवीन कार खरेदी करताना किती काळजी घ्यावी आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन कार खरेदी करावी, हे आज आपण जाणून घेणार आहोत; जेणेकरून कार खरेदी करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही…

कार खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

१. तुमचे बजेट ठरवा

नवीन कार खरेदी करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा टप्पा तुमचे बजेट किती आहे, हे ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला जी कार घ्यायची आहे त्यासाठीचे तुमचे बजेट खरोखरच आहे का? हे एकदा तपासून पाहा. अनेक जण सुरुवातीला महागड्या गाड्या घेतात आणि नंतर हप्ते भरणे कठीण जाते. म्हणूनच तुमच्या बजेटपेक्षा जास्त महाग असलेली कार तुम्ही घेऊ नये. अर्थात, बजेट ठरवत असताना कारवर पुढे येणारा खर्चदेखील लक्षात घेणं गरजेचं आहे. केवळ गाडीचीच किंमत नाही, तर सोबतच त्यावर लागणार कर, विमा, मेन्टेनन्स इत्यादी सर्व खर्चाचा विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही गाडी कर्ज काढून घेणार असाल तर किती ईएमआय भरू शकता, याबाबत माहिती घ्या. बाजारात अगदी सात लाख रुपयांपासून ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये येणाऱ्या अनेक चांगल्या फॅमिली कार आहेत. खरेदीपूर्व बजेटचं नियोजन केल्यानं कार खरेदी करताना तुम्हाला फारशा अडचणी येणार नाहीत. तुमचं बजेट ठरलं की गाडी घेण्याचा मार्ग मोकळा होईल.

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
A 6-6-6 walking regimen will improve your health Experts
६-६-६ चालण्याचा नियम तुमच्या आरोग्य सुधारेल; तज्ज्ञांनीही सांगितले जबरदस्त फायदे…

२. कोणती कार घ्यायची ते ठरवा

तुम्हाला कोणत्या उद्देशाने कार घ्यायची आहे याचा आधी विचार करा. जर तुम्ही कौटुंबिक कारणासाठी कार खरेदी करत असाल आणि तुमचे कुटुंब मोठे असेल तर तुम्ही सात सीटर कार खरेदी करू शकता. तुमच्या कुटुंबात कमी लोक असतील तर तुम्ही पाच सीटर कार खरेदी करू शकता. तसेच, जर तुम्हाला एकट्याने गाडी चालवायची असेल, तर तुम्ही कोणत्याही आसन क्षमतेची कार खरेदी करू शकता; परंतु ते करताना तुम्ही दीर्घकालीन वापर लक्षात ठेवावा. तुम्हाला कोणती कार आवडते ते ठरवा, जर तुम्हाला हॅचबॅक कार आवडत असतील तर हॅचबॅक कारचे पर्याय शोधा. जर तुम्हाला सेडान कार आवडत असेल तर सेडान कार आणि तुम्हाला एसयूव्ही कार आवडत असतील तर ते ठरवा. हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही, एमव्हीपीसारखे कारचे सेगमेंट बाजारात आहेत. या सर्व विभागांचे बजेटही वेगळे आहे. कार खरेदी करण्यापूर्वी विशिष्ट ब्रँडच्या गाडीचा ऑनलाइन रिव्ह्यू पाहा. गाडीमध्ये असलेल्या कमतरता आणि इतर नकारात्मक बाबी जाणून घ्या. सुरक्षेसंबंधित फीचर्सला प्राधान्य द्या.

(हे ही वाचा : फास्टॅग कसा बंद करतात? त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रक्रिया )

३. कारबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

कार खरेदी करण्यापूर्वी इंजिन, अॅक्सेसरीजबाबत संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. सीएनजी, पेट्रोल की डिझेल यापैकी कशावर धावणारी कार खरेदी करायची आहे? ऑटोमेटिक की मॅन्युअल ट्रान्समिशनसह येणारी कार खरेदी करणार आहात? हे ठरवल्यास कारची निवड करणे सोपे जाईल. कार खरेदी केल्यानंतर मेन्टेनन्स आणि मायलेजचा खर्चाचा भार तुम्हाला उचलावा लागतो, त्यामुळे तुमच्या आवडीची कार निवडताना तिचे मायलेज आणि मेन्टेनन्स कॉस्ट नक्की समजून घ्या. डिझेल कारचा मेन्टेनन्स पेट्रोल कारपेक्षा जास्त असतो. त्यामुळे कार खरेदी करताना मेन्टेनन्स आणि मायलेजची पुरेपूर काळजी घ्या. तुम्ही गाडी खरेदी करण्यापूर्वी टेस्ट ड्राइव्हदेखील घेऊ शकता. तसेच विमा, वॉरंटी याबाबतदेखील सर्व माहिती जाणून घ्या.

४. योग्य डील शोधा

तुम्हाला कोणती कार खरेदी करायची आहे हे निश्चित झाल्यावर तुमच्या जवळपास असलेल्या जास्तीत जास्त डीलर्सना भेट द्या. उदाहरणार्थ तुम्ही i20 घेण्याचे ठरवले तर चांगले डील मिळवण्यासाठी तुम्ही तीन ते चार ह्युंदाईच्या डीलर्सकडे संपर्क साधा. प्रत्येक डीलर तुम्हाला काहीतरी अतिरिक्त ऑफर करेल. तसेच कार खरेदी करत असताना त्याची ऑन रोड किंमत तपासावी. यामध्ये कारची किंमत, रजिस्ट्रेशन कॉस्ट, रोड टॅक्स, इन्शुरन्स, फास्टॅग आणि इतर चार्जेसचा समावेश असतो. तसेच डीलर्स अॅक्सेसरीजची किंमतदेखील ऑन रोड किमतीमध्ये जोडतात. त्यातील तुम्हाला काही नको असल्यास तुम्ही ते काढून टाकण्यास सांगू शकता.

५. विमा आणि इतर कागदपत्रं

कार खरेदी करताना विमा (Insurance) सर्वात महत्त्वाचा असतो. जवळजवळ सर्व वाहन कंपन्या आपल्या डीलरकडून कार विमा करून देतात, पण तुम्हाला बाहेरून कमी किमतीत विमा मिळत असेल, तर जरूर बाहेरून विमा घ्या.

(हे ही वाचा : AWD vs 4WD: कार खरेदी करताय, ऑल-व्हील ड्राइव्ह आणि फोर-व्हील ड्राइव्ह यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या…)

६. कारचे बुकिंग

कार खरेदी करत असताना लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कारचे बुकिंग करणे. यामध्ये थोडीशी सावधानता बाळगली पाहिजे. डीलरशिप तुम्हाला कारबरोबर जे कॉम्प्लिमेंटरी प्रॉडक्ट देतेय किंवा देण्याचे वचन दिले, त्याचे डिटेल्स बुकिंग पावतीवर नमूद असले पाहिजेत. अनेकदा असे दिसून आले आहे की, डीलरशिप कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट देण्याचे आश्वासन देतात, परंतु कार विकल्यानंतर ते कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट देण्यास नकार देतात. तसेच यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, कारचे बुकिंग करत असताना बुकिंग रद्द करण्याची रक्कमदेखील तपासून घ्यावी. पावतीवर त्याचा उल्लेख तपासावा. जर का काही कारणास्तव तुम्हाला कारचे बुकिंग रद्द करावे लागले तर डीलर तुम्हाला बुकिंग केलेल्या रकमेतील किती रक्कम परत करणार आहे, हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

७. डिलिव्हरी घेताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष ठेवा

कारची डिलिव्हरी घेताना, डीलरशिपद्वारे तुम्हाला पेमेंटबद्दलच्या सर्व पावत्या आणि इतर सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात दिल्याचीदेखील खात्री केली पाहिजे. तसेच डिलिव्हरी घेताना कारमध्ये कंपनीकडून प्रदान केलेल्या टूल किटसह अनिवार्य स्पेअर व्हील आहे का ते तपासावे. तुम्ही निवडलेली कार, ज्याची डिलिव्हरी तुम्हाला मिळणार आहे, ती संपूर्णपणे तपासून घेणे गरजेचे आहे. कारच्या बाहेरील बाजूवर कुठले डाग किंवा ओरखडे नाहीत याची खात्री करून घ्या. कारण बऱ्याचदा असे दिसून येते की, कारवर काही स्क्रॅच असतात किंवा गाडी बाहेर काढताना डीलरशिपमध्ये योग्य देखभाल न केल्याने वाहनाचे काही पार्ट डॅमेज झालेले असू शकतात. म्हणूनच कारची डिलिव्हरी घेताना कार नीट तपासणे खूप महत्वाचे आहे.

वाहन विषयक तज्ज्ञ ओंकार भिडे सांगतात, “लाख मोलापेक्षा अधिक मौल्यवान असणारं आपलं कुटुंब स्वतःच्या गाडीतून प्रवास करतं. अशावेळी गाडी घेताना ती सुरक्षित घ्यायला प्राधान्य दिले पाहिजे. पूर्वी भारतात गाडी सुरक्षित आहे का नाही, हे करण्यासाठीची कोणतीच व्यवस्था नव्हती. आता भारतात जागतिक पातळीवरील ग्लोबल एनकॅपप्रमाणे पॅसेंजर व्हेईकल क्रॅश टेस्टिंग सुविधा उपलब्ध झाली आहे. यात गाडीला सुरक्षेचे स्टार रेटिंग दिले जातात. जेवढे स्टार रेटिंग जास्त तेवढी ती कार अधिक सुरक्षित आणि एकही स्टार नसलेली गाडी असुरक्षित इतकं सोपं हे आहे. त्यामुळे नवी गाडी घेताना आपल्या कुटुंबाचा आणि आपला स्वतःचा विचार करून ग्लोबल व भारतीय एनकॅप रेटिंग पॅसेंजर व्हेईकल आहे का हे पाहणे अत्यंत उपयुक्त ठरेल.

अशाप्रकारे कार खरेदी करताना वरील सर्व गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

Story img Loader