Hero New Bike: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने भारतात आपली नवीन ‘XPulse 200T 4V’ लाँच केली आहे. ही मोटरसायकल उत्तम स्टाइलिंग आणि अपडेटेड फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे. कशी असेल ही बाईक याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘XPulse 200T 4V’ फीचर्स

हिरोच्या नवीन XPulse 200T 4V मध्ये १९९. सीसी, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड, ४-स्ट्रोक, ४-व्हॉल्व्ह इंजिन दिले जाऊ शकते. ही बाईक १८.९ Bhp आणि १७.३५ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असले. जी ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. या बाईकमध्ये ग्राहकांना XPulse 200T 4V ला ब्लूटूथ-आधारित डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह नेव्हिगेशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स मिळू शकतात. असे असलं तरी या बाईकच्या हार्डवेअर बिट्समध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी शक्यता आहे.

(हे ही वाचा : पेट्रोलची चिंता सोडा, आता देशात आली जबरदस्त मायलेजवाली बाईक! किंमत फक्त… )

‘XPulse 200T 4V’ डिझाईन

XPulse 200T 4V या नवीन मॉडेलमध्ये तीन नवीन रंग पर्याय देण्यात आले आहेत. ही बाईक आता स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शील्ड गोल्डमध्ये उपलब्ध असेल. हे सर्व रंग बाईकला स्पोर्टी लूक देण्यास मदत करतातच शिवाय तिला अतिशय आकर्षक लुकही देतात.

‘XPulse 200T 4V’ किंमत
Hero MotoCorp ने भारतात सर्व-नवीन XPulse 200T 4Valve लाँच केले आहे. कंपनीने त्याची किंमत १,२५,७२६ रुपये ठेवली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New hero xpulse 200t 4v launched the price of the bike is 125726 know features pdb