New Hero Xtreme 250R Launched In India : भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी ‘हीरो मोटोकॉर्प‘ने जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोदरम्यान प्रीमियम सेग्मेंटमध्ये हीरो एक्स्ट्रीम २५०आर बाईकबद्दल माहिती दिली होती. आता कंपनीने २५० सीसी सेग्मेंटमध्ये नवीन मोटरसायकल एक्स्ट्रीम २५०आर (Xtreme 250R) लाँच केली आहे. १.८० लाख रुपये एक्स-शोरूम किंमत असलेली ही एक्स्ट्रीम २५०आर एक मनोरंजक मोटरसायकल आहे. तर नवीन हीरो एक्स्ट्रीम २५०आरबद्दल तुम्हाला माहीत असायला हव्यात अशा ‘पाच‘ गोष्टी नक्की वाचा…
हीरो एक्स्ट्रीम २५०आ बद्दल जाणून घेण्यासारख्या पाच गोष्टी खालीलप्रमाणे :
डिझाइन- डिझाइनच्या बाबतीत सांगायचे झाल्यास Xtreme 250R ही एक आकर्षक दिसणारी मोटरसायकल आहे. त्यात अँगल हेडलाइट, मस्क्युलर टँक, आक्रमक टँक श्राउड्स व मिनिमलिस्टिक रिअर डिझाइन आहे. स्प्लिट सीट डिझाइन आणि टायर हगरसह (tyre hugger) एकत्रित केलेला नंबर प्लेट होल्डर तिला नैसर्गिकरीत्या टेल टाईल देते, ज्यामुळे मागील भाग स्वच्छ राहतो.
उपकरणे- नवीन Hero Xtreme 250R मध्ये मोटरसायकलच्या रंगसंगतीनुसार काळ्या किंवा सोनेरी रंगात यूएसडी फोर्क्स आहेत. मागील बाजूस मोनोशॉक, ११० सेक्शन फ्रंट, १५० सेक्शन रिअर टायर्समध्ये १७ इंच अलॉय व्हील्स, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक व फ्लॅट हँडल बारसुद्धा आहे.
फीचर्स – नवीन हीरो एक्स्ट्रीम २५०आर मध्ये कन्सोल आणि सेफ्टीसाठी ड्युअल चॅनेल स्विचेबल ABS देण्यात आले आहे, ज्यामध्ये रोड व ट्रॅक असे दोन मोड आहेत. रोड मोड एबीएस चालू ठेवते, तर ट्रॅक मोड रिअर नॅनी (rear nanny) बंद करते. मोटरसायकलमध्ये फोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनदेखील आहे; तर सर्व लाईट्स एलईडी सेटअप आहेत.
इंजिन- इंजिन पूर्णपणे नवीन आहे. हे २५० सीसी लिक्विड कूल्ड युनिट आहे, जे २९.५ बीएचपी पॉवर जनरेट करते. इंजिन सहा-स्पीड गिअर बॉक्सशी जोडलेले आहे. त्यामध्ये ॲक्सेसरी म्हणूनही क्विकशिफ्टर देण्यात आलेले नाही.
स्पर्धा- हीरोने २५० सीसी सेग्मेंटमध्ये एक्स्ट्रीमसह प्रवेश केल्याने त्याची स्पर्धा थेट केटीएम २५० ड्युकशी होणार आहे. ऑस्ट्रियन मोटरसायकलमध्ये समान इंजिन स्पेसिफिकेशन्स आहेत. पण, त्याची किंमत खूपच जास्त आहे आणि त्याचबरोबर त्यात अधिक फीचर्सदेखील आहेत. असे असले तरी एक्स्ट्रीम २५०आर या सेग्मेंटमध्ये बजाज डोमिनार २५० शीदेखील स्पर्धा करील.