New Honda Dio 2025 : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्सने नवीन वर्षामध्ये जोरदार सुरुवात करत त्यांची लोकप्रिय होंडा डियो स्कुटरचा अपडेटेड व्हर्जन लाँच केला आहे. या स्कुटरला दोन व्हेरिअंटमध्ये मार्केटमध्ये आणले आहे. पहिला व्हेरिअंट एसटीडी (STD) आणि दुसरा व्हेरिअंट डिएलएक्स (DLX) आहे आज आपण या दोन व्हेरिअंटविषयी आणि त्यांच्या किंमतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

2025 Honda Dio Variants and Price : व्हेरिअंट आणि किंमत

२०२५ होंडा डियोला दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आह. यांची किंमत या प्रकारे आहे . नवीन अपडेटेड व्हर्जन सध्याच्या मॉडेलपेक्षा जवळपास १५ हजार रुपयांनी महागडे आहे.
होंडा डियो STD व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत ७४,९३० रुपये आहे.
होंडा डियो DLX व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत ८५,६४८ रुपये आहे.

Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Girl Juggling On Chandra Song Vs Beatboxing
‘चंद्रा’ गाण्यावर चिमुकलींची जुगलबंदी! ठसकेबाज लावणीला बीट बॉक्सिंगची साथ; VIDEO पाहून अमृता खानविलकरची कमेंट, म्हणाली…
Maha Kumbha Mela 2025 Shankar Mahadevan Mahesh kale Rahul Deshpande suresh wadkar and More To Perform at Grand Cultural Festival
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यात होणार सुरांची बरसात; शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांसह ‘हे’ मराठी कलाकार सादर करणार परफॉर्मन्स
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी
Ather 450 features and price
Ather 450 सीरिजचा नवा अंदाज, जबरदस्त कलर ऑप्शन अन् नवे फीचर्स; जाणून घ्या किंमत
Honda new year discount honda car offers upto 90,000 discount in January
HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत

हेही वाचा : नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा

Honda Dio Booking and Delivery : नवीन होंडा डियोची बुकिंग आणि डिलिव्हरी

होंडा डियो की बुकींग १४ जानेवारीपासून देशभरात अधिकृतरित्या होंडा डिलरशिपवर सुरू करण्यात आली आहे. या महिन्याच्या शेवटी डिलिव्हरी सुरू करू होऊ शकते. डियोचे नवीन अपडेटेड लूक आणि मॅकेनिकल लूक खूप आकर्षित आहे. तसेच या अपडेटेड लूकसह काही फीचर्सचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

Honda Motorcycle & Scooter India on New Honda Dio: होंडा कंपनीचे काय म्हणणे आहे?

या नवीन होंडा डियो अपडेटेड मॉडेलच्या लाँचवर होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया चे विक्री आणि विपणन संचालक योगेश माथुर यांनी सांगितले, “होंडामध्ये, आमच्या ग्राहकांचे आयुष्य वाढवणारे मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे.
डिओ २०२५ नावीन्य, शैली आणि तंत्रज्ञानाच्या परिपूर्ण मिश्रणाचे प्रतिनिधित्व करते. याचे OBD2B- स्वरुप इंजिन फक्त केवळ मानदंडांची पूर्तता करत नाही तर त्याचबरोबर इंधन कार्यक्षमता सुद्धा सुधारते.

2025 Honda Dio New Features : नवीन होंडा डियो मध्ये कोणते बदल दिसून येतात?

2025 साठी, डियोमध्ये फक्त ११०cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन मिळते जे आता OBD2B स्वरुपाचे आहे जे जुन्या मॉडेल प्रमाणे पावर आउटपुट देते. हे इंजिन ७.८ bhp आणि ९.०३ Nm चा पीक टॉर्क देते. याला CVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याचे इंधन कार्यक्षमता सुधारण्यासाठी निष्क्रिय स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह सुसज्ज आहे.

2025 डियो मध्ये काही फीचर अपग्रेड आहे जसे की माइलेज इंडिकेटर, ट्रिप मीटर, इको इंडिकेटर आणि डिस्टंस-टू-एम्प्टी सारख्या आवश्यक माहितीसाठी रीडआउटबरोबर एक नवीन ४.२ -इंच TFT डिजिटल डिस्प्ले, एक USB C-टाइप चार्जिंग पोर्ट आणि हॅलोजन हेडलँप आणि टेललँप इत्यादी फीचर सुद्धा आहेत.

हेही वाचा : Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा ‘ही’ बाईक, फ्लिपकार्टवर सुरु आहे बंपर सेल; काय आहे खास ऑफर?

2025 Honda Dio Colours : डियो पाच रंगामध्ये उपलब्ध

टॉप-स्पेक DLX ट्रिम मध्ये अलॉय व्हील उपलब्ध आहेत. डिझाइनच्या दृष्टीकोनातून स्कूटरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डियो पाच रंगामध्ये उपलब्ध आहे – इंपीरियल रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, पर्ल इग्नियस ब्लॅक + पर्ल डीप ग्राउंड ग्रे, मॅट मार्वल ब्लू आणि मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक.

Story img Loader