देशातील SUV च्या मागणीचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की नवीन SUV जी अजून लाँच झालेली नाही किंवा तिची किमतही जाहीर झालेली नाही, पण आता ग्राहकांना ती खरेदी करण्यासाठी ४ महिने वाट पाहावी लागणार आहे. होय, हे खरं आहे, देशातील एका SUV ने लोकांवर अशी जादू केली आहे की, लाँच होण्यापूर्वीच तिचा वेटिंग पीरियड ४ महिन्यावर पोहोचला आहे.
आम्ही Honda Elevate SUV बद्दल बोलत आहोत, ज्याचे बुकिंग जोरात सुरू आहे. माहितीनुसार, ज्या ग्राहकांनी Honda Elevate चे बुकिंग केले आहे त्यांच्यापैकी ३० टक्के ग्राहक हे होंडा कारचेच मालक आहेत अन् आता त्यांना नवीन SUV मध्ये अपग्रेड करायचे आहे. Honda ही नवीन SUV सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दाखल करेल आणि त्याच महिन्यात डिलिव्हरी देखील सुरू होईल. कंपनीने ३ जुलै रोजी एलिव्हेटचे बुकिंग सुरू केले. चला जाणून घेऊया होंडा एलिव्हेटमध्ये काय खास आहे…
(हे ही वाचा : ५.५ लाखाच्या कारवर संपूर्ण देश फिदा; Swift-Baleno सह सर्वांचा खेळ खल्लास? झाली धडाधड विक्री, मायलेज २५.१९ kmpl)
Honda Elevate SUV मध्ये काय आहे खास?
होंडा Elevate मध्ये एक विश्वसनीय असे १.५ लिटरचे i-VTEC DOHC पेट्रोल इंजिन देत आहे. जे १२१ PS ची पॉवर आणि १४५ पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन एकतर ६-स्पीड MT किंवा ७-स्पीड CVT ऑटोमॅटिकसह जोडले जाऊ शकते. ARAI-प्रमाणित इंधन कार्यक्षमतेचे आकडे मॅन्युअल प्रकारासाठी १५.३१kmpl आणि स्वयंचलित प्रकारासाठी १६.९२kmpl असेल. होंडा Elevate ही एसयूव्ही भारतात सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे.
Honda ने Elevate ला सुरक्षितता तंत्रज्ञान जसे की अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), सहा एअरबॅग्ज, एक लेनवॉच कॅमेरा, आणि ISOFIX चाईल्ड सीट अँकरेजसह असेल. नवीन Honda SUV SV, V, VX आणि ZX या चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.
एलिव्हेटची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ११ लाख असण्याची शक्यता आहे.