Hyundai या वाहन उत्पादक कंपनीने आपली नवीन Creta N Line Night Edition SUV बाजारामध्ये लॉन्च केली आहे. कंपनी Hyundai Creta N Line च्या नाईट एडिशनची फक्त ९०० वाहने लॉन्च करणार आहे. जी आतापर्यंत असलेल्या वाहनांमध्ये कंपनीची सर्वात जास्त आलिशान लुक असलेली स्पेशल सिरीज आहे. नेहमीच्या क्रेटा एन लाईन या मॉडेलच्या तुलनेत Creta N Line Night Edition काही नवीन अपडेटसह लॉन्च करण्यात आली आहे.

या SUV मध्ये २.० लिटर ४ सिलेंडरचे एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे १५७ बीएचपी आणि १८८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. याचे फ्लेक्स फ्युएल सिरीज १६७ बीएचपी पॉवर आणि २०२ एनएम टॉर्क जनरेट करते.यामध्ये तुम्हाला ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळणार आहे. नवीन Hyundai Creta N Line Night Edition ला Advanced Driver Assistance System (ADAS) हे फिचर मिळते. अडॅप्टिव्ह ऑटोपायलट, लेन असिस्टन्स आणि ऑटो ब्रेकिंग सारखे फीचर्स अनेक फीचर्स ADAS मध्ये उपलब्ध आहेत.

हेही वाचा : Russia-Ukraine युद्धविरामासाठी ChatGpt ने सांगितले विविध उपाय! शशी थरूर म्हणतात, “वेगवगेळी विचारसरणी …”

एन लाइन नाइट एडिशन काही प्रमाणात क्रेटा एन लाइन १.० टर्बो सारखे दिसते. यामध्ये तुम्हाला एक्सक्लुझिव्ह एन-लाइन बंपर, डार्क क्रोममध्ये फ्रंट ग्रिल, डबल एक्झॉस्ट, साइड स्कर्ट आणि स्पॉयलरसह येते. SUV ला LED लाइटिंग सिस्टीम आणि विशेष १८-इंच काळ्या रंगाची व्हील्स पाहायला मिळतात.

Hyundai Creta N Line Night Edition हे मॉडेल सध्या ब्राझील देशामध्ये लॉन्च करण्यात आले असून याची किंमत $१८१,४९० (भारतात सुमारे २९ लाख) इतकी आहे. हे मॉडेल Hyundai Creta सिरीजमधील टॉप एन्ड मॉडेल आहे.

Story img Loader