Maruti Suzuki Dzire 2024: मारुती सुझुकीने भारतात सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी आपली नवीन जनरेशन २०२४ मारुती सुझुकी डिझायर लॉंच केली; जी सध्या चर्चेत आहे. जर तुम्ही मारुती डिझायर २०२४ खरेदी करण्याची तयारी करीत असाल; परंतु तुमचे बजेट आठ लाखांच्यादेखील आत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण- आज आम्ही तुम्हाला नवीन डिझायरच्या स्वस्त मॉडेलबद्दल माहिती देणार आहोत, जे तुमच्या बजेट रेंजमध्ये बसते. तुम्हाला या मॉडेलमध्ये काही फीचर्सची कमतरता जाणवेल; पण असे असूनही तुम्हाला ही कार आवडेल. कारण- यावेळी कार अतिशय स्टायलिश डिझाइनमध्ये तयार करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर तिची सुरक्षासुद्धा पूर्ण ५ स्टार्सची आहे म्हणजेच ती तुम्हाला पूर्ण सुरक्षा देईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन डिझायर कोणत्या व्हेरिएंट्समध्ये लॉंच केली आहे?

२०२४ मारुती सुझुकी डिझायर कॉम्पॅक्ट सेडान चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे; ज्यात LXi, VXi, ZXi व ZXi Plus यांचा समावेश आहे. खरेदीदार पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकतात. त्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशन असे दोन्ही पर्याय दिले जातील.

हेही वाचा… New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग

सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती ?

२०२४ डिझायरच्या स्वस्त व्हेरिएंटबद्दल बोलायचं झालं, तर LXi (मॅन्युअल) हा यातला सगळ्यात स्वस्त व्हेरिएंट आहे. या व्हेरिएंटची किंमत फक्त ₹ ६.७९ लाख आहे; तर याच्या टॉप मॉडेलबद्दल बोलायचे झाल्यास त्याची किंमत ₹ १०.१४ लाख (एक्स-शोरूम) आहे.

नवीन डिझायर २०२४ कोणत्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे?

मारुती डिझायर २०२४ बद्दल बोलायचे झाले, तर त्यात 1.2-लिटर Z सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 5,700 rpm वर 82 bhp पॉवर आणि 4,300 rpm वर 112 Nm टॉर्क देते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT गिअरबॉक्ससह येते. मायलेजबद्दल बोलायचं झाल्यास, पेट्रोल मॉडेलला सुमारे 25-26 किमी/लिटरचे मायलेज मिळते; तर सीएनजी मॉडेलला 33 किमी/किलो मायलेज मिळते.

हेही वाचा… मारुतीचा मोठा धमाका! फक्त ११,००० मध्ये प्री-बूक करा ‘ही’ नवीकोरी कार, व्हेरियंट्स अन् फिचर्स पाहून व्हाल फिदा

सेफ्टी फीचर्स

सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे झाले, तर नवीन Dzire स्टॅण्डर्ड सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज आहे. त्यामध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि पादचारी सुरक्षा समाविष्ट आहे. त्याशिवाय या कारला ग्लोबल एनसीएपी चाचणीत५ स्टार रेटिंग मिळाले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New maruti suzuki dzire cheapest model price its features engine and design dvr