2024 Maruti Suzuki Dzire: मारुती सुझुकी ११ नोव्हेंबर रोजी भारतात आपली नवीन जनरेशन २०२४ मारुती सुझुकी डिझायर लॉंच करणार आहे. आता लॉंच होण्याआधीच या कारबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. नवीन मारुती सुझुकी डिझायरने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढांच्या सुरक्षेसाठी (Adult Safety) परिपूर्ण 5-स्टार रेटिंग आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी (Child Safety) 4-स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. मारुती सुझुकीच्या नवीन डिझायरने 5-स्टार ग्लोबल NCAP रेटिंगसह इतिहास रचला आहे, जो ऑटोमेकरसाठी पहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्लोबल NCAP चे क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल फ्रंटल आणि साइड इफेक्ट प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि पादचारी संरक्षण व साइड पोल इम्पॅक्ट असेसमेंट यासह टॉप-रेट केलेल्या मॉडेल्ससाठी अतिरिक्त निकषांवर वाहनांचे मूल्यांकन करतात. नवीन Dezire प्रभावी स्टॅंडर्ड सेफ्टी फिचर्ससह सुसज्ज आहे, ज्यामध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि पादचारी संरक्षण यांचा समावेश आहे.

हेही वाचा… मारुतीचा मोठा धमाका! फक्त ११,००० मध्ये प्री-बूक करा ‘ही’ नवीकोरी कार, व्हेरियंट्स अन् फिचर्स पाहून व्हाल फिदा

कोणत्या फीचर्ससह सुसज्ज असेल?

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन Dezire मोठ्या अपडेट्ससह बाजारात येणार आहे. अशी माहिती आहे की इंटेरियरमध्ये, कार ड्युअल-टोन केबिनसह आहे. फोटोमध्ये मल्टी-फंक्शनल 3-स्पोक स्टीअरिंग व्हील आणि पारंपरिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दाखवले गेले आहेत. एसीच्या स्टाईलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कारण- डिझाईन पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. तथापि, कंट्रोल सेक्शनमध्ये थोडेसे अपडेट दिले आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत, नवीन मॉडेल अधिक प्रीमियम आणि स्पोर्टी लूक ऑफर करताना दिसते.

हेही वाचा… नाद करायचा नाय! Royal Enfield आणतेय ‘ही’ नवीकोरी बाईक, कमाल फिचर्स, दमदार परफॉरमन्स अन् किंमत…

सेंटर कन्सोलचा विचार केल्यास या कारला फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम मिळते आहे; जी अँड्रॉइड, ॲपल आणि ऑटो कार प्लेसह सर्व वायरलेस कार कनेक्ट तंत्रज्ञानाद्वारे समर्थित असेल, अशी अपेक्षा आहे. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, २०२४ डिझायर टॉप-एंड ट्रिममध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर आणि ३६०-डिग्री कॅमेरा यासारखे काही ट्रेंडिंग फीचर्स मिळू शकतात. दरम्यान, या सगळ्या फीचर्सचे तर्क लावण्यात आले असून, ब्रँडकडून अजून या माहितीची पुष्टी झालेली नाही.

इंजिन आणि पॉवर

माहितीनुसार, ग्राहकांना या नवीन कारमध्ये 1.2-लिटर Z-सीरीजचे नवीन 3-सिलेंडर इंजिन मिळेल जे 80 bhp ची कमाल पॉवर आणि 112 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. युनिट 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्ससह जोडले जाईल. कंपनी फिटेड सीएनजी पर्यायदेखील देईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New maruti suzuki dzire earns 5 star rating in global ncap safety test delivers 25 71 kmpl 2024 maruti dzire features and engine dvr