एसयूव्ही सेक्शनमध्ये सध्या प्रचंड मागणी असणाऱ्या टाटा मोटर्सच्या नेक्‍सॉन गाडीची नवीन अवृत्ती कंपनीने बाजारामध्ये लाँच केली आहे. गाडीच्या नव्या व्हेरिएंटची घोषणा बुधवारी (१३ जुलै) एका कार्यक्रमात करण्यात आली. या व्हेरिएंटचं नाव एक्‍सएम+ (एस) असं आहे.

या पूर्वी बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या एक्‍सएम (एस) व एक्‍सझेड+ दरम्‍यानची या गाडीची रेंज आहे. या नव्या व्हेरिएंटची किंमत ९ लाख ७५ हजारांपासून (एक्‍स-शोरूम, दिल्‍ली) सुरु होत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. कॅलगरी व्‍हाइट, डेटोना ग्रे, फ्लेम रेड आणि फॉलियज ग्रीन या रंगांमध्‍ये ही गाडी उपलब्‍ध आहे.

नेक्‍सॉन एक्‍सएम+ (एस) मध्‍ये इलेक्ट्रिक सनरूफ, ७ इंच फ्लोटिंग इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिमसह अ‍ॅड्रॉइड ऑटो व अ‍ॅप्‍पल कार प्‍ले, ४ स्‍पीकर सिस्टिम, कूल्‍ड ग्‍लोव्‍ह बॉक्‍स, रिअर एसी वेण्‍ट्स, रेन सेन्सिंग वायपर्ससारखे फिचर्स आहेत. तसेच ऑटो हेडलॅम्‍प्‍स, डिजिटल इन्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, मल्‍टी ड्राइव्‍ह मोड्स, १२ व्‍होल्‍ट पॉवर सॉकेट आणि शार्क फिन अ‍ॅण्‍टेना यासारखे आधुनिक फिचर्सही गाडीमध्ये आहेत.

मॉडेल्‍स सुरूवातीची किंमत (रुपयांमध्‍ये, एक्‍स-शोरूम दिल्‍ली)

एक्‍सएम+ (एस) (पेट्रोल, मॅन्‍युअल) ९.७५ लाख

एक्‍सएमए+ (एस) (पेट्रोल, ऑटोमॅटिक) १०.४० लाख

एक्‍सएम+ (एस) (डिझेल, मॅन्‍युअल) ११.०५ लाख

एक्‍सएमए+ (एस) (डिझेल, ऑटोमॅटिक) ११.७० लाख