नम्रता पाटील, चेन्नई : बुलेट हे नाव ऐकलं तरी बाइकप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता याच बुलेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बुलेट ३५० चं नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च केलं आहे.

रॉयल एनफिल्डने लॉन्च केलेल्या या नव्या बुलेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बुलेटचा लूक फारच आकर्षक आहे. या बुलेटमधील सर्वात मोठा बदल हा सीटमध्ये करण्यात आला आहे. याची सीट ही सिंगल पीस रुपात देण्यात आली आहे. त्याबरोबरच यात क्रोम फिनिश इंजिन, सोनेरी रंगाचा थ्री डी बॅज, मागील बाजूस डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएस सिस्टमही पाहायला मिळत आहे.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Kanguva Box office collection Day 1
Kanguva: ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘कंगुवा’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?

इंजिनची खासियत

रॉयल एनफील्डच्या बुलेट ३५० बाइकचे इंजिन जे सीरिजचे ३४९ सीसी एअर कूल्ड इंजिन आहे. हाच इंजिन सेटअप मीटीऑर ३५० आणि हंटरमध्येही देण्यात आला आहे. हे इंजिन 20.2 bhp पॉवर आणि 27Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. त्याबरोबरच स्पीड नियंत्रित करण्यासाठी बुलेटला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

BULLET 350
पाच रंगात उपलब्ध

पाच रंगात उपलब्ध

या नव्या कोऱ्या रॉयल एनफिल्ड बुलेटमध्ये पाच रंग उपलब्ध आहेत. यात मिलिट्री ब्लॅक, मिलिट्री रेड, स्टँटर्ड ब्लॅक, स्टँटर्ड मरुन आणि ब्लॅक गोल्ड हे पाच रंग आहेत. या नवीन बुलेटमध्ये हँड पेंटेड गोल्ड पिनस्ट्रीपही पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच ग्राहकांना या बुलेटचे कस्टमायझेशनही करता येणार आहे.

नव्या बुलेटची किंमत किती?

या नवीन रॉयल एनफील्ड बुलेटच्या मिलिट्री व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत १.७४ लाख रुपये आहे. त्याच्या मिड-लेव्हल व्हेरिएंटची (स्टँडर्ड) किंमत १.९७ लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची (ब्लॅक-गोल्ड) किंमत २.१६ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूममधल्या आहेत.