नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० हे रेट्रो थीमला सर्वोत्कृष्ट स्तरावर नेण्यासाठी आहे. कंपनीने नवीन रंग पर्याय देण्याचा पर्याय दिला आहे पण त्याचबरोबर रंग निवडण्यासाठी अनेक पर्याय दिले आहेत. तसेच यात काही फंक्शनल अपडेट्स देखील केले आहेत, जसे की LED हेडलाइट आणि अॅडजेस्टेबल लीव्हर्स दिले आहेत. जेव्हा नवीन क्लासिक ३५० बेस्ट आहे असे वाटते तेव्हा तिला स्पर्धा देणारी दुसरी मोटारसायकल म्हणून जावा ३५० चर्चेत येते. नवीन जावा ३५० या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आले होती. क्लासिक ३५० आणि जावा ३५० हे थेट प्रतिस्पर्धी आहे. नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० विरुद्ध जावा ३५० मध्ये वैशिष्ट्यांच्या बाबतीत तुलना करून पाहा कोणती बाईक आहे बेस्ट.
नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० विरुद्ध जावा ३५० : वैशिष्ट्ये
नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० मध्ये टेलिस्कोपिक फॉर्क्स, ड्युअल रीअर शॉक, ॲलॉय किंवा स्पोक्ड व्हीलपैकी एकाची निवड करण्याचा पर्याय, ड्युअल-चॅनल ABS (टॉप व्हेरिएंट), एलईडी हेडलाइट आणि इंडिकेटरसह दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक, लहान डिजिटलसह ॲनालॉग स्पीडो मीटर मिळतात. गियर पोझिशन इंडिकेटर, ॲडजेस्टेबल लीव्हर्स आणि नेव्हिगेशनसह रीडआउट देखील दिले आहे.
जावा ३५० ला सस्पेंशन आणि ब्रेकिंग सेटअपच्या बाबतीत समान वैशिष्ट्ये दिली आहेत तर त्यात ॲनालॉग मीटर आणि फ्युअल गेज आहे. जावा ३५० हॅलोजन लाइट्ससाठी सेटल आहे आणि जुन्या क्लासिक मॉडेलप्रमाणेच ड्युअल एक्झॉस्ट दिला आहे.
दोन मोटारसायकलींमध्ये, क्लासिक ३५० अधिक सुसज्ज आहे, परंतु जावा ३५० तिचा ओल्ड स्कूल फिल हवा असणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
हेही वाचा – पावसाळ्यात कारच्या काचेवर धुके साचते आहे का? ‘या’ उपायामुळे एका मिनिटात दूर होईल ओलावा
नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० विरुद्ध जावा ३५० : इंजिनीचे वैशिष्ट्ये
क्लासिक ३५०मध्ये ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले J-Series एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, तर जावा ३५०चे ६ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले थोडेसे आधुनिक लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. या दोघांपैकी जावा ३५० मध्ये कागदावर अधिक पॉवर आणि टॉर्क असल्याची खात्री देते आहे, परंतु क्लासिक ३५० रेव्ह रेंजमध्ये खूप आधी टॉर्क ऑफर करते, ज्यामुळे चालवण्यासाठी ती एक सोपी मोटरसायकल ठरते.
तपशील | क्लासिक ३५० | जावा ३५० |
डिस्प्लेसमेंट | ३४९ सीसी | ३३४ सीसी |
पॉवर | २० बीएचपी | २२ बीएचपी |
टॉर्क | २७ एनएम | २८ एनएम |
गिअरबॉक्स | ५-स्पीड | ६-स्पीड |