10 Second Rule At Toll Plaza: टोल नाक्यांवर बरेचदा आपल्याला गर्दी पहायला मिळते. विमानतळांवर तर एसटी स्टँड किंवा लोकलला गर्दी असते तशी गर्दी दिसतेय. अशावेळी लोकांना प्रवासात असताना टोल नाक्यांवर बराच वेळ थांबावे लागत आहे. टोल नाक्यावर १०० मीटरच्या पिवळ्या पट्ट्याचा नियम आहेच, परंतु तो पाळला तर कधीच जात नाही. असाच एक नियम १० सेकंदांचा देखील आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI ने दोन वर्षांपूर्वीच देशातील प्रत्येक टोल नाक्यावर प्रत्येक वाहनांसाठी १० सेकंद हून जास्त सर्विस टाइम नसणार अशी गाइडलाइन्स जारी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोल प्लाझावर उत्तम सेवेसाठी नियम केले

NHAI ने मे २०२१ मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्यानुसार प्रत्येक टोल प्लाझावर प्रत्येक वाहनाची सेवा वेळ १० सेकंदांपेक्षा जास्त नसावी. हा नियम पीक अवर्समध्ये (जेव्हा रहदारी जास्त असेल) लागू होईल. सेवा वेळ म्हणजे टोल टॅक्स वसूल केल्यानंतर वाहनाला प्लाझाच्या पलीकडे जाण्यासाठी लागणारा वेळ.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार टोलनाक्यांवर १०० मीटरपेक्षा जास्त लांब वाहनांची रांग नसावी. त्यामुळे एनएचएआयने प्रत्येक टोल बूथपासून १०० मीटर अंतरावर पिवळी पट्टी बनवण्याची तरतूद केली आहे, जेणेकरून लोकांना टोलच्या आधी १०० मीटरचे अंतर कळू शकेल आणि लांब रांग असल्यास ती शोधता येईल.

(हे ही वाचा : TaTa Punch ची होणार सुट्टी? देशात येतेय सर्वात स्वस्त SUV, किंमत फक्त ५ लाख, फीचर्स पाहून व्हाल थक्क )

नियम काय आहेत?

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल प्लाझावरील टोल कापल्यानंतर वाहनाने पुढे जाण्यासाठी १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागल्यास ते टोल टॅक्स न भरता जाऊ शकते, म्हणजेच तुम्ही टोल नाक्यावर टोल न देता बिनधास्त जावू शकता, असे नियम सांगतो. यासोबतच टोल प्लाझावर १०० मीटरपेक्षा जास्त लांब वाहनांची रांग असल्यास, टोल बुथच्या १०० मीटरच्या आत (पिवळ्या पट्टीच्या आत) रांग येईपर्यंत टोल न भरता वाहनांना जाऊ दिले जाईल.