जुलै महिन्यात अनेक कार्स लॉन्च होणार आहेत. काही लॉन्च झाल्या आहेत. मात्र Kia Seltos ही या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली कार आहे. किया इंडियाने आज आपल्या किया सेलटॉस फेसलिफ्ट २०२३ चे अनावरण केले. लेटेस्ट सेलटॉसचे प्री-बुकिंग वेगळ्या पद्धतीने करावे लागणार आहे. ते कसे ते जाणून घेऊयात.
किया सेलटॉसचे सध्याचे मॉडेलमध्येच अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन किया सेलटॉस फेसलिफ्टमध्ये देखील अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. हेच नवीन फीचर्स या कारला अजून खास बनवतात. नवीन सेलटॉस फेसलिफ्टला X-Line, GT-Line आणि Tech-Line या तीन व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाईल.
2023 Kia Seltos फेसलिफ्टला नवीन १.५-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे जास्तीत जास्त १६० PS पॉवर आणि २५३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन सेल्टोसला सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्ही बनवते. यात AT, DCT, IVT, iMT आणि MT सारखे ट्रान्समिशन पर्याय मिळतात. त्यात आणखी दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.
2023 Kia Seltos Facelift सुरक्षा
2023 सेल्टोस 8 सिंगल टोन, 2 ड्युअल टोन आणि अनन्य मॅट ग्रेफाइट कलर पर्यायामध्ये ऑफर केली आहे. २०२३ सेल्टोसच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या SUV मध्ये तुम्हाला ADAS लेव्हल २ तंत्रज्ञान मिळते ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि बरेच काही समाविष्ट आहे. याशिवाय 6 एअरबॅग्स उपलब्ध असून, रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्सही कायम ठेवण्यात आले आहेत. Kia Motors ने अद्ययावत सेल्टोस अशा वैशिष्ट्यांसह सादर केले आहे की ते आगामी काळात Hyundai Creta तसेच Grand Vitara, Skoda Kushaq, MG Aster आणि Toyota Urban Cruiser Hyrider साठी मोठी समस्या निर्माण करू शकतात.
इंटेरिअर बद्दल बोलायचे झाल्यास अपडेटेड सेलटॉसला दोन १०. २५ इंचाचे डिस्प्ले मिळतात. ज्यामध्ये एक इन्फोटेनमेंट सिस्टम म्हणून काम करतो तर दुसरा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणून काम करतो. प्रीमियम बोस स्पीकर, वायरलेस चार्जिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्स नवीन किया सेलटॉस २०२३ मध्ये जोडण्यात आली आहेत.
Kia Seltos या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असणारी कार असून कंपनीने त्याचे अनावर केले आहे. या नवीन कारचे बुकिंग १४ जुलैपासून केले जाणार आहे. लेटेस्ट सेलटॉसचे प्री-बुकिंग वेगळ्या पद्धतीने करावे लागणार आहे. यासाठी खरेदीदारांना सध्या उपलब्ध असलेल्या सेलटॉस मालकाकडून K-कोड घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच खरेदीदार के-कोडच्या मदतीने नवीन सेलटॉसचे बुकिंग करू शकणार आहेत.