NHAI helpline number : देशात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये लोकांचा जीव देखील गेला आहे. स्थानिक रस्त्यांवर अपघात झाल्यास रहिवाशी मदतीला धावून येऊ शकतात. मात्र, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची खूप वर्दळ असते, अशात अपघात किंवा काही झाले तर मदतीला कोण येणार हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण चिंता करण्याचे कारण नाही. महामार्गावर तुम्ही निश्चिंत प्रवास करू शकता. केवळ तुम्हाला शासनाने जारी केलाला हेल्पलाइन क्रमांक लक्षात ठेवावा लागेल. महामार्गावर तुम्हाला काही समस्या आली तर हा क्रमांक डायल करून तुम्ही मदत मिळवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा आहे हेल्पलाइन क्रमांक

संकटाच्या काळात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) जारी केलेल्या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुम्ही मदत मिळवू शकता. १०३३ हा टोल फ्री क्रमांक ३६५ दिवस २४ तास सेवेत असतो. या क्रमांकावर कॉल केल्यावर तुम्ही दिलेल्या माहितीनुसार कॉलसेंटरवरील एक्झिक्युटिव्ह तुमच्यासाठी मदत पाठवू शकतो. अपघात झाल्यावर रुग्णवाहिका हवी असल्यास किंवा वाहनामध्ये बिघाड झाल्यास या क्रमांकावर संपर्क केल्यास मदत मिळू शकते. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.

(रेनॉल्टने सादर केली रेट्रो स्टाईल इलेक्ट्रिक एसयूव्ही, सिंगल चार्जवर इतकी मिळेल रेंज, पाहा फोटो)

१०३३ वर ही मदत दिली जाते

  • जखमी झाल्यास किंवा लागल्यास फर्स्ट एडची मदत मिळते.
  • मोठा अपघात झाल्यास रुग्णवाहिका मिळते.
  • सुरक्षेशी संबंधित प्रकरणात पेट्रोलिंग वाहन दिले जाते.
  • वाहन बिघडल्यास, पेट्रोल संपल्यास सुरक्षा देणे.
  • वाहन बिघडल्यास टो करून गॅरेज पर्यंत पोहोचवून देण्याची मदत मिळते.