Nissan Motor India देशातील एक आघाडीची आणि लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. Nissan Motor India कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन घोषणा केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी मोफत AC चेकअप कॅम्प करण्याची घोषणा केली आहे. हा कॅम्प निसान कंपनीच्या अधिकृत वर्कशॉप्समध्ये घेतला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसान आणि डॅटसनचे ग्राहक या कालावधीत त्यांची वाहनांमधील एसी तपासण्यासाठी निसान कनेक्ट App वर किंवा निसान मोटर इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व्हिस अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

हेही वाचा : बाईकमध्ये CC चं महत्त्व काय? तुमच्यासाठी कोणती दुचाकी ठरेल बेस्ट, जाणून घ्या…

निसान कंपनीचे प्रशिक्षित प्रोफेशनल्स वाहनांच्या एसी चेकअप कॅम्प चालवणार आहेत. तसेच निसानचे अस्सल स्पेअर पार्टसचा वापर करून क्वालिटी सर्व्हिस देणार आहेत. या कॅम्पमध्ये चेकापसाठी २० पॉइंट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये मोफत एसी सेवा, कारची बाहेरील आणि आतील भागांची तपासणी आणि रोड टेस्टचा समावेश आहे. याशिवाय सर्व वाहनांसाठी मोफत टॉप वॉशची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना गाडीच्या करण्यात आलेल्या चेकअपच्या मजुरीवर २० टक्के आणि व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसवरती १० टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त, ग्राहकांना या कॅम्पमध्ये स्पर्धात्मक किमतींमध्ये प्री-पेड देखभाल पॅकेजचा फायदा होईल. या पॅकेजमुळे ग्राहकांच्या वाहनांच्या मेंटेंनस खर्चामध्ये २० टक्क्यांची बचत होऊ शकते. तसेच त्रासविरहित अनुभव ग्राहकांना मिळणार आहे. हे मेंटेनन्स पॅकेज देशभरामध्ये निसानच्या कोणत्याही अधिकृत वर्कशॉपमध्ये ग्राहकांना कॅशलेस मेंटेनन्ससह अन्य अनेक लाभ मिळणार आहेत. ज्यामध्ये ५ वर्षांचा कव्हरेज, कोणत्याही प्रकारच्या किंमत वाढीशिवाय मेंटेनन्स सेवा मिळणार आहे.

याचा आणखी एक फायदा असा होणार आहे की कारची विक्री झाली आणि ती कार दुसऱ्याच्या नावावर झाली तरी देखील हे पॅकेज ट्रान्सफर करता येणार आहे.हे पॅकेज निसानने ग्राहकांसाठी गाड्यांची एकूण मालकी किंमत कमी करून त्यांना निसान या ब्रँडसह अखंड सोप्या सेवेचा अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने सादर केले आहे.

हेही वाचा : कारच्या Average अन् Mileage मध्ये काय फरक असतो माहितेय का? समजून घ्या यामागील अंतर

कधी होणार AC चे मोफत चेकअप ?

निसान कंपनी देशभरामध्ये ग्राहकांसाठी मोफत AC चेकअप कॅम्प करण्याची घोषणा केली आहे.हा कॅम्प १५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीमध्ये होणार आहे. निसान कंपनीचे म्हणणे आहे, त्यांच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना कार मालकीचा उत्तम अनुभव मिळेल. तसेच ग्राहकांचा निसान ब्रॅण्डवरील विश्वास आणखी वाढेल. हे कॅम्प निसानच्या देशभरातील १२२ ठिकाणी उभारले जाणार आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nissan announce free ac checkup camp in across india for customers 15 april to 15 june 2023 tmb 01
Show comments