सणासुदीचा काळ सुरु झाला असून अनेक कंपन्या आपल्या कार्सना अपडेट करुन बाजारात सादर करत आहेत. यातच आता निसान मोटर्सने Magnite Kuro एडिशनला नव्या अवतारात सादर केले आहे. निसान मॅग्नाइटच्या या नवीनतम आवृत्तीचा आतील आणि बाह्य भाग पूर्णपणे काळा आहे. चला तर पाहूया या कारमध्ये काय असेल खास…

Nissan Magnite Kuro Edition डिझाइन

Magnite Kuro Edition मध्ये समोर एक वेगळी ग्रिल दिसेल. ज्याला काळा रंग देण्यात आलाय. स्लाईड प्लेट आणि रूफ रेल देखील ब्लॅक थीममध्ये देण्यात आली आहे. कारच्या हेडलॅम्पमध्येही काळ्या रंगाचे इन्सर्ट आहेत. दाराचे हँडलही काळे करण्यात आले आहेत. तुम्हाला कारमध्ये ब्लॅक अलॉय व्हील मिळतील ज्यामध्ये ब्रेक कॅलिपर लाल करून स्पोर्टी लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
Nearly 90000 Honda Elevate Suvs Sold Since Launch, See This Details Honda Elevate Suvs price details
वर्षभरात तब्बल ९० हजार ग्राहकांनी खरेदी केली होंडाची ‘ही’ एसयूव्ही कार; जाणून घ्या काय आहे एवढं खास
Maruti Suzuki to increase car prices from Jan 2024
नवीन वर्षात वाहने महागणार! मारुती सुझुकीसह बहुताशांकडून किंमतीत वाढ
December car sale big offers upto lakhs on Maruti Suzuki honda Hyundai tata motors and Mahindra cars
या वर्षातील सर्वात मोठी ऑफर! मारुतीपासून ते महिंद्रापर्यंत कंपन्या देतायत भरघोस सूट, नवीन कार खरेदीवर होईल लाखोंची बचत
skoda Kylaq suv launched know its price and varients google trends
Skoda Kylaq SUV: स्कोडाने केली सगळ्यांची बोलती बंद! सर्वात स्वस्त एसयूव्ही झाली लाँच, किंमत फक्त…
Skoda kylaq booking starts from 2 December today know its delivery date features engine and specifications
आता फक्त ‘स्कोडा’चीच हवा! ६ एअरबॅग्स असणाऱ्या सगळ्यात स्वस्त SUVची बुकिंग झाली सुरू, ‘या’ तारखेपाहून होणार डिलिव्हरी

Nissan Magnite Kuro Edition वैशिष्ट्ये

कारचे इंटिरिअर खूपच प्रीमियम बनवण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक रूफ लाइनर दिसेल, तर स्टीयरिंग व्हीलवर ब्लॅक लेदर रॅप दिसेल आणि एसी व्हेंट्सवर ब्लॅक ट्रिम देखील दिसेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, ८ इंच टचस्क्रीन यासारखे फीचर्स पाहायला मिळतील. कारच्या सेफ्टी रेटिंगबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला GNCAP कडून ४ स्टार रेटिंग मिळते.

(हे ही वाचा : टाटा, महिंद्रा, टोयोटा ‘या’ कंपनीच्या कार्ससमोर सर्वांची बोलती बंद, लाखो लोकांच्या खरेदीसाठी रांगा )

Nissan Magnite Kuro Edition मायलेज

कंपनीने कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. हे आधीपासून अस्तित्वात असलेल्या १.० लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल. तुम्ही कारमध्ये मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि सीव्हीटी गिअर बॉक्सचा पर्याय घेऊ शकता. जर आपण कारच्या मायलेजबद्दल बोललो तर ती सरासरी २७ किलोमीटर प्रति लीटर देते.

Nissan Magnite Kuro Edition किंमत

कंपनीने अद्याप कारच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही पण, लवकरच तिची किमतही बुकिंगसोबतच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, जवळपास १० लाख रुपये किमतीत ही कार बाजारात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मार्केटमध्ये या कारची स्पर्धा Nexon, Seltos, Brezza आणि Creta सारख्या वाहनांशी असेल.

Story img Loader