Nissan Magnite Red Edition Discontinued: निसान मॅग्नाइटची रेड एडिशन अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला आता ही कार खरेदी करता येणार नाही. ऑटोमेकरने ही कार रेड एडिशन XV वेरिएंटवर आधारित जुलै २०२२ मध्ये लाँच केली होती. XV Red, XV Turbo Red आणि XV Turbo CVT Red व्हेरियंट बंद करण्यात आले आहेत. आता या व्हेरियंटऐवजी, टॉप XV प्रीमियम अंतर्गत XV प्रीमियम (O), XV प्रीमियम (O) रंग आणि प्रीमियम (O) Turbo CVT चे तीन नवीन व्हेरियंट सादर केले जातील. या व्हेरियंटचे फीचर्स कंपनीने अद्याप उघड केलेले नाहीत.
Nissan Magnite इंजिन
निसान मॅग्नाइटमध्ये १.०-लिटर नॅचरली एस्पिरेटेड आणि १.०-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहेत. दोन्ही इंजिन पाच-स्पीड मॅन्युअलशी जोडलेले आहेत, तर CVT युनिट टर्बो-पेट्रोलमध्ये देखील उपलब्ध आहे. निसानने नुकतीच मॅग्नाइटची किंमत २०,५०० रुपयांनी वाढवली आहे. ही कंपनी लवकरच नवीन उत्सर्जन नियमांनुसार त्यांची वाहने अपडेट करणार आहे.
(हे ही वाचा : मारुतीची नवीकोरी SUV अन् दिसायलाही भारी, आता पांढऱ्या रंगामध्येही खरेदी करता येणार?)
Nissan Magnite वैशिष्ट्ये
मॅग्नाइट रेड एडिशनवरील अद्ययावत आणि नवीनतम वैशिष्ट्यांमध्ये बोल्ड बॉडी ग्राफिक्स, टेल डोअर गार्निश आणि विशेष लाल रंगाचा बॅज, नवीन फ्रंट ग्रिल, फ्रंट बंपर क्लॅडिंग, व्हील आर्च आणि बॉडी साइड क्लॅडिंग यांचा समावेश आहे. प्रकाशासाठी, रेड एडिशनमध्ये एलईडी फॉग लॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प (DRLs) देखील मिळतात.
या कारच्या एक्सटीरियर लूकबद्दल बोलायचे झाले तर या कारच्या इंटीरियरलाही रेड टच देण्यात आला आहे. याच्या डॅशबोर्डमध्ये लाल रंग देण्यात आला आहे. यासोबतच यात ८.० टचस्क्रीन, ७.० फुल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात प्रीमियम रेड-थीम असलेला फ्रंट बोर्ड, डोअर साइड आर्मरेस्ट आणि सेंटर कन्सोलवर लाल अॅक्सेंट देखील मिळतो.