Cheapest SUV in india: भारतीय ऑटो मार्केटमध्ये आता एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हींना जोरदार मागणी आहे. भारतात वेगवेगळ्या साईजच्या SUV च्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे आणि त्यामुळेच वाहन उत्पादक कंपन्यांनी कॉम्पॅक्ट आणि मिड साईज SUV लाँच करण्याचा सपाटा लावला आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही भारतातील स्वस्त SUV बद्दल प्लॅन करू शकता. आज आम्ही तुम्हाला ६ लाखांच्या रेंजमध्ये येणाऱ्या जबरदस्त कारबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही ‘Nissan Magnite’ बद्दल बोलत आहोत. रेनो किगर, टाटा पंच व्यतिरिक्त, ही एसयूव्ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या मारुती ब्रेझा, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू सारख्या कारशी स्पर्धा करते. चला जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्ये.
Nissan Magnite ची जाणून घ्या खासियत
Nissan Magnite इंजिन
इंजिन आणि पॉवर बद्दल सांगायचे झाल्यास ही एसयुवी एन्ट्री लेव्हल वेरियंट मध्ये नॅचरली एस्पिरेटेड १.० लीटर पेट्रोल इंजिनसह येते. जी ७१ बीएचपी ची पॉवर आणि ९६ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच कार मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह उतरवली आहे. या व्यतिरिक्त कंपनी यामध्ये १.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन सुद्धा आहे. जो टॉप अॅन्ड वेरियंटमध्ये देण्यात आला आहे.
(हे ही वाचा : १० लाखाची जबरदस्त फीचर्सने सुसज्ज असलेली ‘ही’ कार केवळ २ लाखात आणा घरी, पाहा कुठे मिळतेय डील? )
Nissan Magnite फीचर्स
कारमधील फिचर्ससाठी ७ इंचाचा टीएफटी इंस्ट्रुमेंट क्लस्टर, ८ इंचाचा टचस्क्रिन सिस्टिम, ६ स्पीकर, सेगमेंट मध्ये प्रथमच अराउंड व्यू मॉनिटर, ईको फंक्शन ड्रायव्हिंग, टायर मॉनिटरिंग सिस्टिम, वेलकम अॅनीमेशन, मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हिल, डुअल एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशनसह अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम यांचा समावेश आहे.
Nissan Magnite डिझाइन
कारच्या बाहेरील डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास, कारला तळाशी LED फॉग लॅम्प आणि १६-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हीलसह L-आकाराचे LED DRLs मिळतात. यासोबतच यामध्ये पैडल लॅम्प आणि ३६० डिग्री कॅमेराची सुविधाही उपलब्ध आहे.
(हे ही वाचा : मार्केटमध्ये तुफान मागणी असणाऱ्या मारुतीच्या ‘या’ कारला १ लाखात घरी आणा, एवढा बसेल EMI )
Nissan Magnite किंमत
या कारचे सुरूवातीचे व्हेरिएंट ६ लाख रुपयांपेक्षाही कमी आहे. मात्र त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १० लाखांहून अधिक आहे. बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ५.९७ लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत १०.७९ लाख रुपये आहे.