भारतीय वाहन बाजारात स्वस्त एसयूव्हींची मागणी वाढली आहे. सबकॉम्पॅक्ट एसयूव्हींच्या सेगमेंटमधील गाड्यांची तुफान विक्री होत आहे. जपानी वाहन निर्माती कंपनी निसान भारतात मॅग्नाईट ही छोटी एसयूव्ही विकते. या कारला बाजारात जोरदार मागणी आहे. मॅग्नाईट ही देशातल्या सर्वात स्वस्त एसयूव्हींपैकी एक आहे. दरम्यान, कंपनीने आता ही कार अपडेट केली आहे.

मॅग्नाईटच्या अपडेटेड मॉडेलमध्ये नवीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स दिले आहेत. या कारच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये आता डायनॅमिक कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, हायड्रोलिक ब्रेक असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसारखे सेफ्टी फीचर्स मिळतील. याशिवाय या कारमध्ये ईबीडीसह एबीएस, ड्युअल फ्रंटल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स आणि फ्रंट सीट बेल्ट रिमायंडरसारखे फीचर्स मिळतील.

मॅग्नाईटच्या किंमती

निसान मॅग्नाईटच्या एंट्री लेव्हल एक्सई व्हेरिएंटची किंमत ६ लाख रुपये इतकी आहे. या कारचं टॉप व्हेरिएंट एक्सव्ही टर्बो प्रीमियम डुअल टोन मॉडेलची किंमत १०.९४ लाख रुपये इतकी आहे. या एक्स शोरूममधल्या किंमती आहेत. सुरक्षेसाठी या कारच्या रेंज टॉपिंग व्हेरिएंटमध्ये आयसोफिक्स चाईल्ड सीट अँकरेज, ३६० डिग्री कॅमेरा, अँटी थेफ्ट अलार्म, स्पीड सेन्सिंग डोर लॉक, इम्पॅक्ट, सेन्सिंग अनलॉकसारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> ‘या’ ७ सीटर कारची Maruti Ertiga वर मात, किंमत फक्त ५.२५ लाख, मायलेज २७ किमी

सुरक्षित कार

या कारला सुरक्षेच्या बाबतीत ग्लोबल एनसीएपीने ४ स्टार सेफ्टी रेटींग दिलं आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी या कारला २ स्टार रेटिंग मिळालं आहे.