SUV सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या मध्यम आकाराच्या SUV मध्ये आज आम्ही Nissan Magnite बद्दल बोलत आहोत, जी आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह एक SUV आहे.

Nissan Magnite च्या XE व्हेरिएंटच्या सुरुवातीची किंमत ५,७६,५०० रुपये आहे जी ६,४१,२६५ रुपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला ही SUV खरेदी करायची असेल, तर तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम खर्च न करता सहज डाउन पेमेंट योजनेसह ही कार घरी घेऊन जाण्याचे संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घेऊ शकता.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही SUV खरेदी केली तर कंपनीशी संबंधित बँक यासाठी ५,७७,२६५ रुपये कर्ज देईल.

या कर्जानंतर, तुम्हाला ६४,००० रुपये किमान डाउन पेमेंट भरावे लागेल आणि त्यानंतर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला १२,२०८ रुपये मासिक EMI भरावे लागेल.

निसान मॅग्नाइटवरील कर्जाची परतफेड कालावधी बँकेने ६० महिन्यांसाठी म्हणजे ५ वर्षांसाठी ठेवली आहे आणि बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल.

आणखी वाचा : एका चार्जमध्ये २०० KM रेंज देण्याचा दावा करते ही स्टायलिश इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या किंमत


हा डाऊन पेमेंट प्लॅन वाचून तुम्ही ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही त्याची फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

Nissan Magnite मध्ये, कंपनीने 999 cc चे इंजिन दिले आहे जे १ लीटर पेट्रोल इंजिन आहे आणि हे इंजिन ७२ PS ची पॉवर आणि ९६ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते, ज्यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जाते.

आणखी वाचा : अवघ्या १ ते २ लाखांच्या बजेटमध्ये Hyundai Santro खरेदी करू शकता, जाणून घ्या ऑफर

फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास यात Apple CarPlay आणि Android Auto शी कनेक्टिव्हिटीसह ८ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

याशिवाय ऑटो एसी, रिअर एसी व्हेंट, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, जेबीएल स्पीकर्स, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर, एबीएस आणि ईबीडी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Nissan Magnite च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार १७.७ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.