निसान इंडियाने भारतात मॅग्नाइटचे ३० हजार युनिट्स विकल्याचं जाहीर केलं आहे. येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढणार आहे. जपानी कार कंपनीने २ डिसेंबर २०२० रोजी भारतात मॅग्नाइट सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली होती. खडतर स्पर्धा, कोविड-19 आणि सेमीकंडक्टर चिप्सची जागतिक टंचाई असतानाही कंपनीने ३० हजाराहून अधिक कार वितरित केल्या आहेत. मॅग्नाइटसाठी आतापर्यंत ७२ हजार बुकिंग मिळाल्याची माहिती निसानने दिली आहे. निसानचे आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, युरोप आणि ओशनिया क्षेत्राचे अध्यक्ष गिम कार्टियर म्हणाले, “निसान नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन योजनेचा एक भाग म्हणून मॅग्नाइटच्या यशासाठी निसान इंडियाला निसान ग्लोबल प्रेसिडेंट अवॉर्ड प्रदान करताना मला आनंद होत आहे. आम्ही एकत्रितपणे भारतात सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करू इच्छित आहोत.”

लॉन्चिंगवेळी निसान मॅग्नाइटची एक्स शोरूम किंमत ४.९९ लाख किमत होती. मात्र गाडी लॉन्च झाल्यापासून किमतीत अनेकवेळा वाढ करण्यात आली आहे. सध्या, मॅग्नाइटची ची किंमत ५.७१ लाख ते १०.१५ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. याशिवाय, कंपनी ग्राहकांना गाडी सबस्क्रिप्शन प्लॅनद्वारे देखील देते. मॅग्नाइट ही गाडी निसान ब्रँडची भारतीय बाजारपेठेतील पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. एसयूव्ही चार प्रकारात उपलब्ध आहे. एक्सई, एक्सएल, एक्सवी आणि एक्सवी प्रिमियम असा प्रकारात उपलब्ध आहे.

निसान मॅग्नाइट एसयूव्हीमध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – एक १.० लिटर नॅच्युअरली एस्पिरेटेड मोटर आणि १.० लिटर टर्बो पेट्रोल. पहिलं इंजिन सुमारे ७१ बीपीएच आणि ९६ एनएम टॉर्क तयार करण्यासाठी ट्यून केलेला आहे. दुसरं इंजिन ९९ बीपीएच आणि १६० एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशिवाय टर्बो पेट्रोलसह सीव्हीटी समाविष्ट आहे. सीव्हीटी प्रकारात थोडा कमी टॉर्क जनरेट होतो.

Story img Loader