देशाबाहेर सर्वाधिक निर्यात होणाऱ्या कार्सची यादी समोर आली आहे. या यादीत पुन्हा एकदा मारुती सुझुकीची प्रीमियम हॅचबॅक कार बलेनोचा दबदबा पाहायला मिळाला. फेब्रुवारी महिन्यात या कारच्या ३,५०० हून अधिक युनिट्सची निर्यात करण्यात आली आहे. परंतु निसानच्या एका कारने बलेनोला मागे टाकलं आहे. २१ टक्के वार्षिक वाढीसह निसान सनीने परदेशी मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. ही भारतातून सर्वाधिक निर्यात होणारी कार ठरली आहे.
निसान सनी या कारची भारतीय बाजारातील विक्री बंद आहे. परंतु ही कार भारताबाहेरचं मार्केट गाजवतेय. सनीने बलेनो, सेल्टॉस, सोनेट, क्रेटा, डिझायर आणि अर्टिगाला मागे टाकलं आहे. विक्री मंदावल्यानंतर कंपनीने या कारची भारतात विक्री बंद केली. आता ही कार भारतात तयार करून परदेशात निर्यात केली जाते.
हे ही वाचा >> ‘या’ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, हजारोंचा डिस्काउंट, तरी तीन महिन्यात विक्री शून्य, आता कंपनीने…
निसान सनी या कारच्या गेल्या महिन्यात ३,७६५ युनिट्सची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने या कारच्या ३,१०९ युनिट्सची विक्री केली होती. या कारच्या निर्यातीत २१.१० टक्के वाढ झाली आहे. मारुती बलेनोने ३,५५२ युनिट्सच्या निर्यातीसह दुसरा नंबर पटाकवला आहे. गेल्या वर्षी कंपनीने या कारच्या ३,२२८ युनिट्सची निर्यात केली होती. या कारच्या निर्यातीत १०.४ टक्के वाढ झाली आहे.
सर्वाधिक निर्यात होणाऱ्या टॉप १० कार्स
निसान सनी – ३,७६५ युनिट्स
मारुती सुझुकी बलेनो – ३,५५२ युनिट्स
किआ सेल्टॉस – ३,५५१ युनिट्स
किआ सोनेट – ३,११७ युनिट्स
ह्युंदाई क्रेटा – ३,१०१ युनिट्स
ह्युंदाई ग्रँड आय १० – २,४२५ युनिट्स
मारुती सुझुकी डिझायर – २,३५२ युनिट्स
ह्युंदाई वेर्ना – २,२४३ युनिट्स
मारुती सुझुकी अर्टिगा – २,१७३ युनिट्स
मारुती सुझुकी सेलेरियो – २,०१७ युनिट्स