तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी एखादी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, आज आम्ही तुम्हाला देशात लवकरच ७ सीटर SUV कार लाँच होणार आहेत. जपानची कार उत्पादक निसान कंपनीची मोठी कार लाँच होणार आहे. निसानची अपकमिंग कार X-Trail लवकरच लाँच होणार आहेत. चला जाणून घ्या दमदार ७ सीटर SUV कारबद्दल संपूर्ण माहिती.

निसानने भारतात तिच्या SUV ची चाचणी सुरू केली आहे. त्यापैकी निसान एक्स-ट्रेल २०२३ च्या मध्यापर्यंत बाजारात येऊ शकते. ही एसयूव्ही टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देईल. ही कार रेनॉल्ट-निसानच्या CMF-C प्लॅटफॉर्मवर आधारित चौथ्या पिढीचे मॉडेल असेल. ही कार CBU मार्गाने भारतात येईल.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…

पॉवरट्रेन कशी आहे?

नवीन X-Trail ही ई-पॉवर हायब्रीड तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली कंपनीची भारतातील पहिली कार असेल. त्याच्या जागतिक प्रकाराला १.५L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह सौम्य हायब्रिड आणि १.५L टर्बो पेट्रोल युनिटसह मजबूत हायब्रिड पॉवरट्रेन मिळते. सौम्य हायब्रीड प्रकाराला 2WD प्रणाली मिळते आणि १६३PS/ ३०० Nm आउटपुट मिळते. ही कार ९.६ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि २०० किमी/तास इतका वेगवान आहे.

(हे ही वाचा : मोठी रेंज, पॉवरफुल बॅटरी अन् नवीन रंग पर्यायांसह Ather ची स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; फीचर्सही जबरदस्त )

आकार काय असेल?

निसान एक्स-ट्रेलची लांबी ४६८० मिमी, रुंदी २०६५ मिमी आणि उंची १७२५ मिमी असेल. त्याचा व्हीलबेस २७५०mm आणि ग्राउंड क्लीयरन्स २०५mm असेल. त्याच्या ग्लोबल व्हेरियंटला ५ आणि ७-सीटरच्या दोन सीटिंग कॉन्फिगरेशन मिळतात.

Nissan X Trail SUV वैशिष्ट्ये

नवीन Nissan X Trail SUV ला प्रगत ड्रायव्हर सहाय्यता प्रणाली, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह १२.३-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ट्राय-झोन क्लायमेट कंट्रोल, १२.३-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एलईडी हेडलॅम्प, हेड-अप डिस्प्ले (HUD) मिळेल. इलेक्ट्रिक टेलगेट, ३६० डिग्री कॅमेरासह इतर अनेक वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील.

फॉर्च्युनरशी होणार स्पर्धा

टोयोटाच्या फॉर्च्युनरला दोन इंजिन पर्याय आहेत, १६६ PS/२४५ Nm आउटपुटसह २.७-लीटर पेट्रोल इंजिन आणि २०४PS/५००Nm आउटपुटसह २.८-लिटर टर्बो-डिझेल इंजिन आहे. यात ५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. ही कार २WD आणि ४WD पर्यायांमध्ये येते.