Nita Ambani Most Expensive Car: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी कोट्यवधींची उलाढाल करतात. अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबांपैकी एक आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत जाणून घेण्याची सर्वसामान्य माणसांना नेहमी उत्सुक्ता असते. अब्जाधीश उद्योगपती सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्या आणि आलिशान बंगले आहेत. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या नेहमीच त्यांच्या लक्झरी लाइफमुळे चर्चेत असतात.

मुकेश अंबांनी यांच्या पत्नी निता अंबानींचं राहणीमान हे नेहमीच त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारे असते. त्यांचे राहणीमान, कपडे, अलिशान घड्याळं, ब्रँडेड सँडल, महागडे परफ्यूम, बॅग्स यांसह इतरही गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नीता अंबानी महागड्या वस्तूंच्या मालक आहेत. नीता अंबानींच्या महागड्या शौकांमध्ये गाड्यांचाही नाव देखील समाविष्ट असल्याची माहिती आहे.

Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
jayalalithaa wealth case
१० हजार साड्या, ७५९ चपलेचे जोड, हजार किलो चांदी, जयललिता यांची डोळे दीपवणारी संपत्ती आता सरकार दरबारी जाणार
well equipped gang stole 500 liters of diesel on Samriddhi Highway
समृद्धी महामार्गावर ५०० लिटर डिझेलची चोरी, टोळ्यांकडून चारचाकी वाहनांचा वापर…
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ
man sold car gifted by friend and buy an ambulance
असेही औदार्य! मित्रांनी भेट दिली कार, ती विकून घेतली रुग्णवाहिका…
nashik raigad guardian minister
नाशिक, रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा, निर्णय प्रलंबित राहण्याची चिन्हे, शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली

(हे ही वाचा: ८ लाखाच्या मारुतीच्या ‘या’ एसयूव्हीनं Nexon, चं वर्चस्व संपवलं! झाली तुफान विक्री, १० लाखांहून अधिक लोकांनी केली खरेदी)

मुकेश आणि नीता अंबानी यांना त्यांच्या महागड्या गाड्यांमधून प्रवास करताना अनेकदा पाहिले गेले आहे. उद्योगपती मुकेश अंबांनी यांचा Z+ सिक्युरिटीचा ताफा जेव्हा रस्त्यावरुन जातो, त्यावेळी त्यांच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्या पाहायला मिळतात. त्यांच्या ताफ्यात जगातील सर्वात सुरक्षित कारचा समावेश असतो. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडे अनेक आलिशान गाड्या आहेत आणि मुंबईत त्यांच्या घरात गाड्यांचं गॅरेज असल्याची माहिती आहे.

नीता अंबानींच्या ताफ्यात ऑडी लॅम्बोर्गिनी सारख्या अनेक कार आहेत, आता नीता अंबानी यांच्या कारच्या ताफ्यात आणखी एक कार दाखल झाली आहे. या कारचे नाव Audi A9 Chameleon आहे. या कारचा लूक टेस्ला कारसारखाच आहे. असे बोलले जात आहे की, ऑडी कंपनीने फक्त मर्यादित कार बनवल्या आहेत आणि ही कार अजून भारतात उपलब्ध झालेली नाही. भारतातील ऑडीची एकमेव कार नीता अंबानींकडे आहे. ही कार नीता अंबानींना भेट देण्यात आली आहे.

उद्योगपती मुकेश अंबांनी यांनी ही एडिशन एसयूवी नीता अंबानींना गिफ्ट केली आहे. ही कार खूप सुरक्षित आणि महागडी कार मानली जाते. या कारची किंमत कोटीच्या घरात आहे. पण या कारची किंमत एक-दोन कोटी नाही तर तब्बल ९० कोटी रुपये इतकी आहे.

Story img Loader