First Ethanol Car Launched: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, मंगळवारी, २९ ऑगस्ट २०२३ रोजी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार लाँच केली. ‘टोयोटा इनोव्हाचं फ्लेक्स फ्लूअल’ मॉडेल त्यांनी आज सादर केलं आहे. आता देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच शंभरी टक्के इथेनॉलवर कार धावेल. पर्यावरणासाठीही ही कार फायदेशीर ठरेल.

इथेनॉलची खास म्हणजे, हे इंधन शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या ऊसापासून हे बनवलं जातं. या कारचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, ती इथेनॉलसह हायब्रिड प्रणालीवर ४० टक्के वीज निर्मिती करेल, त्याचाही प्रवासासाठी वापर करता येईल. ही कार जगातील पहिली BS6 फेज-२ इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-इंधन कार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले

(हे ही वाचा : Half Sleeve Shirt, लुंगी, चप्पल अन् सँडल घालून बाईक चालवल्यास ट्रॅफिक पोलीस दंड आकारतात का? वाचा ‘हा’ नियम )

शेतकऱ्यांना होणार फायदा

ऊस आणि मका सारख्या घटकांपासून इथेनॉल तयार केले जाते. यामुळेच पेट्रोल-डिझेल इतर देशांतून विकत घेण्यापेक्षा इथेनॉल हा एक चांगला पर्याय आहे. ही देशातील पहिली कार आहे जी पेट्रोल, इथेनॉल आणि इलेक्ट्रिकवर धावले. या कारमध्ये १.८-लिटर पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. जे २० टक्के ते १०० टक्के इथेनॉल मिश्रणावर धावू शकते. देशात उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. शेती उत्पादनांवर हे इंधन आधारित असल्याने याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल असं मानलं जात आहे.

सामान्यांसाठी ही गाडी उपलब्ध होणार आहे, की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.