Yamaha NMax 125 Scooter : यामाहाने (Yamaha) जागतिक बाजारपेठेसाठी नवीन एनमॅक्स १२५ (NMax 125) स्कूटरचे अनावरण केले आहे. एनमॅक्सचा नवीन व्हेरिएंट म्हणजे रेंज-टॉपिंग ट्रिम, ज्याला ‘यामाहा टेक मॅक्स’ असेही म्हणतात. नवीन यामाहा एनमॅक्स १२५ (Yamaha NMax 125 Tech Max Scooter) टेक मॅक्स स्कूटर स्टॅण्डर्ड मॉडेलवर आधारित आहे. पण, त्यात काही नवीन गोष्टीसुद्धा समाविष्ट केल्या जाणार आहेत. तसेच ही स्कूटर भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये पदार्पण करील, अशी अपेक्षा आहे.
यामाहा एनमॅक्स १२५ टेक मॅक्स स्कूटरमध्ये नवीन काय असणार (Yamaha NMax 125 Scooter Colour Options )
नवीन १२५ सीसी (125cc) टेक मॅक्समध्ये ड्युएल प्रोजेक्टर एलईडी लायटिंग, किंचित ट्विक केलेले एर्गोनॉमिक्स, २५ लिटर स्टोरेज एरिया, कीलेस इग्निशन व टाईप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. यामाहाने एनमॅक्स टेक मॅक्सला Garmin नेव्हिगेशनसह नवीन ४.२ इंचांचा टीएफटी डिस्प्लेदेखील दिला आहे. स्कूटरला प्रीमियम स्वरूप देण्यासाठी लेदर अपहोल्स्ट्री देण्यात आले आहे.
यामाहा एनमॅक्स १२५ टेक मॅक्स स्कूटर रंग पर्याय (Yamaha NMax 125 Scooter Colour Options )
NMax च्या इतर व्हेरिएंट्समध्ये सामायिक केलेल्या टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, मागील बाजूस मोनो शॉक, १३ इंच टायर, अलॉय व्हील्स आणि दोन्ही टोकांना ABS सह डिस्क ब्रेकचा समावेशसुद्धा असणार आहे. नवीन यामाहा एनमॅक्स १२५ टेक मॅक्स (Yamaha NMax 125 Tech Max) सिरॅमिक ग्रे व डार्क मॅग्मा या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
यामाहा एनमॅक्स १२५ टेक मॅक्स स्कूटर इंजिन (Yamaha NMax 125 Scooter Engine)
नवीन स्कूटरमध्ये १२५ सीसी लिक्विड-कूल्ड मोटर आहे, जी १२बीएचपी पॉवर आणि ११.२ पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन बहुतेक स्कूटरप्रमाणे सीव्हीटीसह जोडलेले असेल. Yamaha सध्या भारतात NMax विकत नाही. पण, कंपनी आगामी भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये स्कूटर प्रदर्शित करेल, अशी अंदाज वर्तवण्यात आला आहे.