Anti Fog Tips: सध्या देशात थंडी (Winter Season) सुरु झाली आहे. थंडी म्हटलं की, धुके आलेच. थंडीमुळे ठिकठिकाणी धुके आणि धूर पाहायला मिळत आहे. धुक्यामुळे दृश्यमानताही बरीच कमी झाली आहे. रस्त्यावर रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी मोठ्याप्रमाणात धुके असतात. या धुक्यामुळे अनेकदा पुढचे काहीच दिसत नसल्यामुळे अपघात होतात. ज्यामध्ये तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. धुक्यामुळे बऱ्याचदा गाडी चालकाला पुढचे काही दिसत नसल्यामुळे या काळात अपघाताच्या घटना वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
धुक्यामुळे सतत काचा पुसाव्या लागतात. मात्र, आता काचा पुसण्याची गरज नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आले आहोत, ज्याद्वारे तुम्हाला धुक्यापासून तुमच्या कारच्या काचाचे संरक्षण करता येणार आहे. हिवाळ्यात, कारच्या काचेवर फॉगिंग प्रतिबंधित केले पाहिजे आणि दृश्यमानतेची विशेष काळजी घेऊन वाहन चालविले. यासाठी तुम्ही अनेक टिप्स अवलंबू शकता. इतकेच नाही तर अनेक कंपन्या अँटी फॉग स्प्रे बाजारात विकतात. चला तर मग हा अँटी फॉग स्प्रे कसा वापरायचा जाणून घेऊया.
(हे ही वाचा : Govinda Cars Collection: हिरो नंबर वन आहे ‘या’ महागड्या कारवर फिदा; किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का )
डिफॉगर आणि वायपरचा ‘असा’ करा वापर
बाहेरून गाडीच्या विंडशील्डवर धुके साचते आणि आतून वाफ साचते. तापमानातील फरकामुळे हे घडते. कारच्या आतील तापमान आणि कारच्या बाहेरचे तापमान वेगळे असताना तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागतो. या प्रकरणात, कारच्या वायपरचा वापर करून विंडशील्डच्या बाहेरील धुके काढून टाका आणि विंडशील्डच्या आतील बाजूस साचलेली वाफ काढून टाकण्यासाठी कारच्या आत डीफॉगर वापरा.
कारमध्ये दिलेले डिफॉगर बटण दाबल्यावर, एसी व्हेंटमधून बाहेर पडणारी हवा थेट विंडशील्डवर पडते, ज्यामुळे साचलेली वाफ काही सेकंदात काढून टाकली जाते. या व्यतिरिक्त, जर तुमच्या कारमध्ये डिफॉगर नसेल किंवा ती खराब असेल तर तुम्ही कारचे ग्लास थोडेसे उघडू शकता, यामुळे कारच्या आतील आणि बाहेरील तापमानातील फरक आणि विंडशील्डवरील गोठलेल्या वाफेमध्ये कमी होईल.
अँटी फॉग स्प्रे किंमत
इथे कोणत्याही कंपनीचे नाव दिले गेले नाही पण जर तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइटवर सर्च केले तर तुम्हाला अनेक अँटी फॉग स्प्रे सापडतील. त्यांची किंमत फक्त रु.३००-४०० पासून सुरू होते.