Mahindra Cars in India: भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचं एसयूव्ही सेगमेंटवर वर्चस्व आहे. ही देशातली चौथी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. सध्या भारतीय बाजारात महिंद्रा कंपनी या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या एसयूव्ही विकते. यात छोट्या बोलेरो निओपासून ते मोठ्या स्कॉर्पिओ पर्यंतच्या अनेक कारचा समावेश आहे. महिंद्रा कंपनी विक्रीच्या बाबतीत देशातली सर्वात मोठी कंपनी आहे. महिंद्राच्या एक्सयूव्ही ७००, महिंद्रा थार, महिंद्रा एक्सयूव्ही ३०० या कारची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, महिंद्राची आणखी एक एसयूव्ही आहे जिच्याकडे बाजारात ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
महिंद्राच्या ‘इतक्या’ युनिट्सची विक्री
महिंद्रा कंपनीने नुकत्याच अनेक प्रकारच्या गाड्या बाजारात दाखल केल्या आहेत. त्यातील काही गाड्यांना ग्राहकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. कंपनीची प्रवासी कार विक्री नोव्हेंबर २०२२ मध्ये ५६ टक्क्यांनी वाढून ३०,३९२ युनिट्स झाली.
(हे ही वाचा : ‘या’ 8-सीटर कारच्या बंपर डिमांडने मोडले सर्व रेकॉर्ड, फीचर्स जाणून तुम्हीही पडाल प्रेमात!)
ग्राहकांनी पसंत न केलेल्या SUV चे ‘असे’ आहेत फीचर्स
महिंद्राच्या या कारमध्ये ११९८cc चे पेट्रोल इंजिन दिले असून जे ५,५०० Rpm वर ८२ hp ची पॉवर आणि ३५००-३६०० Rpm वर १५ Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच गिअरबॉक्ससाठी इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स लेस आहे. ब्रेकिंग स्टिटिमसाठी फ्रंटला डिस्क ब्रेक आणि रियर मध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. तर सस्पेंशनसाठी KUV100 NXT च्या फ्रंटला मॅकफर्शन स्ट्रट सस्पेंशन आणि रियरमध्ये क्वाइल स्प्रिंग आणि हायड्रॉलिक गॅस चार्ज्ड शॉक एब्स्रोबरसह सेमी इंडीपेंडट ट्विस्ट बीम सस्पेंशन दिले आहे. तसेच डायमेंशन बाबत बोलायचे झाल्यास, KUV100 NXT ची लांबी ३७००mm, रुंदी १७३५ mm, उंची १६५५mm, फ्रंट ट्रॅक १४९०mm, रियर ट्रॅक १४९०mm, व्हिलबेस २३८५m, ग्राउंड क्लिअरेंस १७०mm, सिटिंग कॅपासिटी ६ सीटर आणि ५ सीटर ऑप्शन, फ्यूल टॅंक हा ३५ लीटर क्षमतेचा दिला आहे.
महिंद्राच्या ‘या’ SUV कडे ग्राहकांनी फिरवली पाठ
‘Mahindra kuv100 nxt’ महिंद्राच्या या SUV कडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. त्याची किंमत रु. ६.१८ लाखांपासून सुरू होते आणि रु. ७.८४ लाखांपर्यंत जाते. या नोव्हेंबर महिन्यात महिंद्र KUV100 चे फक्त २ युनिट्स विकले गेले. त्याच वेळी, याच्या एक महिना आधी, ऑक्टोबर २०२२ मध्ये, त्याचे ० युनिट्स विकले गेले होते. नोव्हेंबर २०२१ मध्येही असेच काहीसे घडले होते. त्यानंतरही एकही युनिट विकता आले नाही.