Norton V4CR : ब्रिटिश मोटरसायकल निर्माता कंपनी नॉर्टनने पहिली सर्वात पॉवरफुल नेकेड स्पोर्ट बाइक Norton V4CR ला लॉन्च केले आहे. कंपनी या बाइकचे फक्त २०० मॉडेल बनविण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे याला विशेष महत्त्व मिळणार आहे. या बाइकची किंमत ४२. ८१ लाख रुपये आहे. डिझाइन आणि स्पेसिफिकेशनवरून सध्या बाइकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊ या.
डिझाइन
नॉर्टन V4CR हॅण्ड मेड अॅल्युमिनियम फ्रेमपासून बनविण्यात आली आहे. ज्यासोबत टिटॅनियम एग्जॉस्ट सिस्टम देण्यात आली आहे. शॉर्ट बॉडी आणि स्टबी टेलमुळे ही बाइक आणखी आकर्षित दिसते. बाइकच्या फ्रंट साइडला आकर्षक डिझाइनची एलईडी हेडलाइट आणि १५ लिटरचा केवलर रेनफोर्स्ड फ्यूल टँक देण्यात आला आहे, ज्यामुळे ही कॅफे रेसरची संपूर्ण डिझाइन अधिक आकर्षित दिसते.
इंजिन स्पेसिफिकेशन
या पावरफुल मोटरसायकलला पॉवर देण्यासाठी नॉर्टनने १२०० cc चे ७२- डिग्री V4 चे इंजिन दिले आहे. ट्रान्स्मिशनसाठी बाय-डायरेक्शन क्विकशिफ्टरसह सहा स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. हे इंजिन १८५ bp ची पॉवर आणि १२५ Nm चा पीक टार्क जनरेट करते.
हेही वाचा : WhatsApp ने ‘या’ युजर्ससाठी रोलआऊट केले Status Archive फिचर, जाणून घ्या काय होणार फायदा
ब्रेक आणि सस्पेन्शन
खूप चांगल्या सस्पेन्शनसाठी या बाइकमध्ये दोन्ही बाजूंना फूल ॲडजस्टेबल ओहलिन्स दिले आहे. ब्रेकिंग सिस्टममध्ये ब्रेंबो कॅलिपर लावले आहे. नॉर्टन V4CR मध्ये लिलन-अँगल सेन्सेटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल आणि तीन इंजिन मोडसारख्या इलेक्ट्रॉनिक अॅड्सची सवलत मिळते. मोटारसायकलमध्ये किलेस इग्निशन आणि फुल-कलर सहा इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे.
हेही वाचा : ChatGPT वापरून अशी करा कमाई, ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय
नॉर्टन मोटरसायकलचे सीईओ डॉ. रॉबर्ट हेन्शेल म्हणतात, “नॉर्टन वी4सीआर परफेक्ट Design आणि तगडा performance देणारा एक रॉ एक्स्प्रेशन आहे. V4CR पहिले नवे मॉडल आहे. यामध्ये इंजिनीअरिंग आणि डिझाइन टिम सुरुवातीच्या स्केचपासून कॉन्सेप्ट प्रोडक्शनपर्यंत शेवटच्या फिनिशिंग टचद्वारे आपल्या विजनमध्ये सतर्क राहली आहे. मागील तीन वर्षांपासून आम्ही या बाइकवर काम करत होतो. आम्हाला आनंद आहे की आता आम्ही ही बाइक लॉन्च केली आहे.”